AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update | कोरोनाने चिंता वाढवली, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, काय घडतंय?

राज्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. सरकारकडून नागरिकांना घाबरुन न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. असं असताना आता राज्य सरकारने संभाव्य धोका लक्षात घेऊन मोठं पाऊल उचललं आहे.

Maharashtra Corona Update | कोरोनाने चिंता वाढवली, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, काय घडतंय?
| Updated on: Dec 27, 2023 | 6:07 PM
Share

मुंबई | 27 डिसेंबर 2023 : महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाने डोकंवर काढलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा आता पुन्हा हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे राज्य शासन आणि आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. आरोग्य विभागाकडून संभाव्य धोका लक्षात घेता सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. असं असताना आता राज्य सरकारने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी आता 168 वर पोहोचली आहे. यामध्ये कोरोनाच्या नव्या JN-1 व्हेरिएंटने बाधित झालेल्या 10 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट फार जलद गतीने संक्रमित होणारा आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तसेच संभाव्य संकट लक्षात घेता राज्य सरकारने नव्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाकडून पुन्हा एकदा तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स नेमण्यात आली आहे. या टास्कफोर्समध्ये दिल्ली आय.सी.एम.आर.चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर, एम.यु.एच.एस. नाशिकच्या कुलगुरु लेफ्ट. जन. माधुरी कानीटकर, पुण्याचे बी. जे. मेडीकल कॉलेजचे डॉ. राजेश कार्यकते, नवले मेडीकल कॉलेजच्या डॉ. वर्षा पोतदार, पुण्याच्या नवले मेडीकल कॉलेजचे डॉ. डी. बी. कदम (फिजिशियन) यांच्यासह आणखी काही दिग्गज डॉक्टरांचा समावेश आहे.

सरकारच्या आदेशात नेमकं काय म्हटलंय?

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच त्यावर उपाय योजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदला (टास्क फोर्सची) निर्मिती करण्यात आली होती. कोविड बाधेची कारणिमांसा, विश्लेषण आणि उपाययोजना करण्यास्तव तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आले होते. राज्यात पुन्हा एकदा कोविड-१९ ची रुग्ण संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता सदर टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. सबब, सदर टास्क फोर्सची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अखेर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, असं राज्य शासनाच्या आदेशात म्हटलं आहे. या आदेशात टास्क फोर्सची कामेदेखील अधोरेखित करण्यात आली आहेत.

टास्क फोर्स काय काम करणार?

  • गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे.
  • कोविड-१९ क्रिटिकल केअर हॉस्पीटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे.
  • गंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे.
  • टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी ठरविल्याप्रमाणे इतर कोणतीही शिफारस.
  • टास्क फोर्सने केलेल्या शिफारशींचा अहवाल सदस्य सचिव यांनी शासनास वेळोवेळी कळविण्यात यावे.

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 103 वर

विशेष म्हणजे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात आता पुन्हा कोरोना संक्रमणाचा प्रकोप बघायला मिळतोय. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 19 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 103 वर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईत आज दिवसभराच 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.