कोपर्डी खटला: सरकारी वकील सुप्रीम कोर्टात गैरहजर, संभाजीराजेंकडून ट्विटरवर संताप व्यक्त

कोपर्डी बलात्कार प्रकरणी आज (7 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होती. मात्र, या सुनावणीला सरकारी वकील गैरहजर राहिले.

कोपर्डी खटला: सरकारी वकील सुप्रीम कोर्टात गैरहजर, संभाजीराजेंकडून ट्विटरवर संताप व्यक्त
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 7:17 AM

नवी दिल्ली  : कोपर्डी बलात्कार प्रकरणी आज (7 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होती. मात्र, या सुनावणीला सरकारी वकील गैरहजर राहिले. त्यामुळे आज या खटल्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. कोपर्डी खटल्याचा सहा महिन्यात निकाल लागावा, अशी मागणी अॅड. दिलीप तौर यांनी कोर्टापुढे केली होती. आज याबाबत महत्त्वाची सुनावणी होती. मात्र, सरकारी वकील या सुनावणीला गैरहजर राहीले. त्यामुळे भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला.

“कोपर्डीतील अमानवीय घटनेमूळे संपुर्ण मराठा समाज अस्वस्थ झाला. सतत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जागृत होऊन राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज एकवटला. मात्र, या घटनेतील आरोपींच्या विरोधात न्यायालयात खटला चालू असताना आज महत्त्वपूर्ण सुनावणीस सरकारी वकील गैरहजर राहतात कसे?”, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

“सरकारने या बाबतीत कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता असताना वकिलांमुळे खटल्याच्या निकालास दिरंगाई होत असेल तर याला कोण जबाबदार? असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारला. “लोकांचा कायदा, सुव्यवस्थेवरचा विश्वास उडत आहे, राज्य सरकारने याप्रकरणी त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर न्यायालयाला सहकार्य करणे अपेक्षित आहे”, असे संभाजीराजे म्हणाले.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. नववीत शिकणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील तीन नराधमांनी बाईकवरुन पाठलाग केला. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची अमानुष हत्या केली. या घटनेनंतर राज्यासह देशात खळबळ उडाली होती.

कोपर्डी बलात्कारातील आरोपी नराधम जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही नगरच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. 29 नोव्हेंबर 2017 रोजी हा निकाल देण्यात आला. ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी त्यावेळी पीडितेची बाजू मांडली. तर आरोपींच्या वतीने अॅड बाळासाहेब खोपडे यांनी युक्तीवाद केला.

दरम्यान, नगरच्या विशेष न्यायालायाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली असली, तरी पुढील कायदेशीरप्रक्रिया अद्याप बाकी आहे. याप्रकरणातील दुसरा आरोपी संतोष भवाळने फाशीविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं. मात्र, याच गोष्टीवरुन सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत या खटल्याचा सहा महिन्यात कोर्टाने निकाल द्यावा आणि पीडितेच्या आई-वडिलांना आर्थिक साहाय्य द्यावे, अशा दोन मागण्या करण्यात आल्या होत्या.

मराठा मूक मोर्चे

कोपर्डी बलात्कारानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. या घटनेचा निषेध म्हणून मराठा क्रांती मूकमोर्चे निघाले. औरंगाबादेत 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा मूक मोर्चा निघाला. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात विशाल संख्येने मोर्चे काढण्यात आले.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.