Maha Awas Yojana: मार्चपर्यंत 5 लाख घरे बांधणार, राज्य सरकारचे महाआवास अभियान 2.0 सुरू; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

| Updated on: Feb 03, 2022 | 5:27 PM

कोरोनाचं संकट ओसरताच राज्य सरकार पुन्हा एकदा कामाला लागले आहे. राज्य सरकार येत्या 31 मार्चपर्यंत राज्यात 5 लाख घरे बांधणार आहे. महाआवास योजना 2.0 अभियाना अंतर्गत ही घरे बांधण्यात येणार आहेत.

Maha Awas Yojana: मार्चपर्यंत 5 लाख घरे बांधणार, राज्य सरकारचे महाआवास अभियान 2.0 सुरू; मुश्रीफ यांची मोठी घोषणा
मार्चपर्यंत 5 लाख घरे बांधणार, राज्य सरकारचे महाआवास अभियान 2.0 सुरू; मुश्रीफ यांची मोठी घोषणा
Follow us on

मुंबई: कोरोनाचं संकट  (corona) ओसरताच राज्य सरकार (maharashtra government) पुन्हा एकदा कामाला लागले आहे. राज्य सरकार येत्या 31 मार्चपर्यंत राज्यात 5 लाख घरे बांधणार आहे. महाआवास योजना 2.0 अभियाना अंतर्गत ही घरे बांधण्यात येणार आहेत. या आधीही याच योजने अंतर्गत राज्य सरकारने ग्रामीण भागात पाच लाख घरे बांधून गोरगरीबांना हक्काचा निवारा दिला होता. आताही ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी या घरांची घोषणा करून गोरगरीब जनतेला दिलासा दिला आहे.

महाआवास अभियान 2.0 ची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सहसचिव मंगेश मोहिते, राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण गृहनिर्माण) संचालक डॉ.राजाराम दिघे, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपसंचालक निलेश काळे, राज्य ग्रामीण योजनेचे उपसंचालक श्रीमती मंजिरी टकले तसेच राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपआयुक्त, प्रकल्प संचालक, गट विकास अधिकारी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

कोरोना काळ असतानाही महाआवास अभियानाचा पहिल्या टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. अनेक वर्षापासून बेघर आणि गरजू लोकांची यादी तयार करण्यात आली होती, मात्र त्यांना घरे मिळत नव्हती. या गरजू लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी ही मोहीम राबविण्यास आपण सुरूवात केली. या मोहिमेमुळे वेळेत घरे तयार करण्याची जिद्द आणि जागृती अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 5 लाख घरे बांधण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

भूमिहिन लाभार्थ्यांना जागा द्या

महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्पयात गुणात्मक व संख्यात्मक बदल करण्यात आला असून त्यात लॅंड बॅंक, सॅंड बॅंक, बहुमजली गृहसंकुले या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी केल्या. मंजुरीनंतर पहिला हप्ता वितरीत करण्याचा कालावधी 37 दिवसावरून 7 दिवसांवर आणावा. मंजुरीनंतर घरकुले वेळेत पूर्ण करावीत. प्रधानमंत्री आवास योजनेतील उर्वरित मंजुरी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, भूमिहिन लाभार्थ्यांना तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे द्या

घरकुलाला अधिक गती मिळावी यासाठी केंद्रीय ग्रामविकास विभागाने ‘ड’ प्लस यादीला मान्यता दिली आहे. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यास 100 टक्के घरकुलांना मंजुरी देण्यात यावी. नाविण्यपूर्ण घरे बांधण्याचे जे काम अपूर्ण आहेत, ती कामे जलदगतीने पूर्ण करावीत आणि लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

संबंधित बातम्या:

Nitesh Rane Arrest : नितेश राणेंना पोलिसांनी घडवलं कोकण दर्शन, विविध ठिकाणी नेत 5 तास चौकशी

Nitesh Rane : गल्लीतला वाद दिल्लीत नेणं महागात पडलं, नितेश राणेंचं ते ट्विट डिलीट

जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत, रणजितसिंह नाईक-निंबाळकर मोदींच्या भेटीला, मोदींकडे काय मागितलं?