Nitesh Rane Arrest : नितेश राणेंना पोलिसांनी घडवलं कोकण दर्शन, विविध ठिकाणी नेत 5 तास चौकशी

नितेश राणेंची कस्टडी मिळाल्यापासून पोलीसही वेगवान तपासाला लागले आहेत. पोलीस राणेंना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत चौकशी करत आहेत. नितेश राणेंना पोलिसांनी मोठ्या फौजफाट्याच्या बंदोबस्तात बाहेर काढले होते.

Nitesh Rane Arrest : नितेश राणेंना पोलिसांनी घडवलं कोकण दर्शन, विविध ठिकाणी नेत 5 तास चौकशी
नितेश राणेंना वेगवेगळ्या ठिकाणी नेत पोलिसांकडून चौकशी
दिनेश दुखंडे

| Edited By: दादासाहेब कारंडे

Feb 03, 2022 | 4:37 PM

सिंधुदुर्ग : जेव्हापासून नितेश राणे (Nitesh Rane Arrest) पोलिसांना शरण गेले आहेत तेव्हापासून पुन्हा राजकारण तापलं आहे. शिवसेना(Shivsena) आणि भाजप (BJP) पुन्हा आमनेसामने आले आहेत. नितेश राणे यांच्यावर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच पोलिसांना नितेश राणेंची कस्टडी मिळाली आहे. नितेश राणेंची कस्टडी मिळाल्यापासून पोलीसही वेगवान तपासाला लागले आहेत. पोलीस राणेंना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत चौकशी करत आहेत. नितेश राणेंना पोलिसांनी मोठ्या फौजफाट्याच्या बंदोबस्तात बाहेर काढले होते. नितेश राणे यांना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. यावेळी राकेश परब आणि नितेश राणे यांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. यात पोलिसांच्या हाती आणखी काही महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.

नितेश राणे यांना पोलीस गोव्यालाही नेण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी पहिल्यांदा नितेश राणे यांना सावंतवाडीच्या दिशनेने नेले होते. मुंबई-गोवा हायवेवरून नितेश राणे यांना पोलीस नेत होते. सकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यातून नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यातही आणण्यात आले होते. पोलिसांनी कोर्टाला दहा दिवस कस्टडी देण्याची विनंती केली होती, मात्र कोर्टाने पोलिसांना दोनच दिवसांची कोठडी दिली. त्यानंतर पोलिसांकडे कमी वेळ असल्याने पोलिसांनी तातडीने सुत्रं हलवण्यास सुरूवात केली आहे. या पोलीस तपासात आणखी काय माहिती हाती लागते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच नितेश राणे यांची कस्टडी उद्या संपत असल्याने उद्या कोर्टात काय होणार? असाही प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

उद्या राणेंना बेल मिळणार की मुक्काम कोठडीतच?

भाजप आमदार नितेश राणे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी उद्या संपत असल्याने पोलीस त्यांना उद्या कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. त्यांना कोर्टात सहाजिकच नितेश राणे यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकिलांकडून प्रयत्न होईल. मात्र कोर्ट उद्या राणेंना बेल देतं की पुन्हा कोठडी मुक्कामी पाठवतं? हे उद्याच कळेल. गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे यांची जामीनासाठी पळापळ सुरू होती. सत्र न्यायालयापासून ते दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊनही नितेश राणे यांना जामीन मिळाला नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी निराशा आली. नितेश राणे यांच्या जामीनासाठी कालही त्यांच्या वकिलांची धडपड सुरू होती.

Nitesh Rane : गल्लीतला वाद दिल्लीत नेणं महागात पडलं, नितेश राणेंचं ते ट्विट डिलीट

राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्र नंबर वन; निकाल जाहीर होण्याचं घोंगडं अडलं कुठं?

Pune Crime | पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगलेल्या पतीनं अनैतिक संबंधातून आणखी एका महिलेसोबत केलं असं की … , पोलिसांनी केली अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें