साखर कारखानदारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, थकीत कर्जास सरकारची हमी

| Updated on: Sep 22, 2021 | 8:27 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नगरपालिका, महापालिकेत बहुसदस्य प्रभाग पद्धती ठेवण्यासह, साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास सरकारची थकहमी देण्यासह 11 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

साखर कारखानदारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, थकीत कर्जास सरकारची हमी
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नगरपालिका, महापालिकेत बहुसदस्य प्रभाग पद्धती ठेवण्यासह, साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास सरकारची थकहमी देण्यासह 11 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गाळप हंगामाकरिता साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास शासनाची थकहमी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. (Maharashtra Government’s fatigue on short-term loans of sugar factories)

गाळप हंगाम 2021-22 करीता राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या 28 कोटी रुपये इतक्या अल्पमुदत कर्जास शासन थकहमी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

दोन कारखान्यांच्या 28 कोटींच्या कर्जास थकहमी

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखाना आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. चंद्रभागानगर, या दोन साखर कारखान्यांना अनुक्रमे रक्कम दहा कोटी रुपये व अठरा कोटी रुपये अशा 28 कोटी रुपये अल्पमुदत कर्जास थकहमी देण्यात येईल. यासाठी काही अटी टाकण्यात आल्या आहेत.

यापूर्वी न‍िश्चित केलेले शासनाच्या हमीपोटी प्रति क्विंटल साखर उत्पादनावर 250 रुपये हे स्वतंत्र टॅगींग हमीवरील कर्जाची व्याजासह एक वर्षाच्या आत पूर्ण परतफेड करण्यात यावी. शासनाने हमीबाबत निर्गमित केलेल्या निर्णयाचे लाभधारक /कर्जदार साखर कारखान्यांकडून अटी व शर्तीची पूर्तता करुन बँकेकडून ऑक्टोंबर 2021 पूर्वी रक्कम वितरीत न झाल्यास त्यानंतर वितरीत होणाऱ्या कर्जास शासन हमी कोणत्याही परिस्थितीत लागू राहणार नाही.

साखार कारखान्यावर बँकेचा पूर्ण वेळ सनदी लेखापाल नेमणार

शासन हमी देण्यात आलेल्या कारखान्यांवर बँकेने पूर्ण वेळ सनदी लेखापाल/कॉस्ट अकाऊंटन्ट नेमावा. 2021-22 हंगामास शासन हमीची मुदत फक्त 1 वर्ष राहील. गाळप हंगाम 2020-21 करीता देण्यात आलेल्या पूर्व हंगामी कर्जास शासन थकहमीची मुदत 1 वर्षाने म्हणजेच 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच वाढविण्यात येत आहे. शासन हमीवरील कर्जासाठी संबंधीत कारखान्यांच्या संचालक मंडळाने समान मूल्याची वैयक्तिक हमी दिल्यानंतरच शासनाने‍ थकहमी द्यावी. त्यानंतर बँकेने कारखान्यास शासन थकहमीवरील कर्जाची रक्कम वितरीत करावी.

…वैयक्तिक हमी सामुदायिक हमीमध्ये परावर्तीत होईल

बँकेने कारखान्यास यापूर्वी सन 2019-20 व 2020-21 मध्ये शासन हमीवर दिलेल्या कर्जाच्या विनियोगाबाबत कारखान्यांच्या लेख्यांची तपासणी करावी. सदर तपासणीमध्ये कर्जाच्या विनियोगाबाबत गंभीर मुद्दे आढळून न आल्यास वैयक्तिक हमी सामुदायिक हमीमध्ये परावर्तीत होईल अन्यथा वैयक्तिक हमी पुढे लागू राहील.

इतर बातम्या

महापालिका प्रभाग पद्धत ते साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास सरकारची थकहमी, ठाकरे सरकारचे 11 मोठे निर्णय

(Maharashtra Government’s fatigue on short-term loans of sugar factories)