Eknath Shinde : हजारो उत्तर भारतीय एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार, संध्याकाळी भेटीचा भव्य कार्यक्रम

| Updated on: Jul 21, 2022 | 1:02 PM

Eknath Shinde : हजारो उत्तर भारतीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार

Eknath Shinde : हजारो उत्तर भारतीय एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार, संध्याकाळी भेटीचा भव्य कार्यक्रम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us on

मुंबई : एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अश्यात अनेक शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा देत आहेत. तर दुसरीकडे आता सर्वसामान्य माणसांमधूनही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला पाठिंबा देत आहेत. आता उत्तर भारतीयांनीही शिंदेंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर सह एमएमआर क्षेत्रातील हजारो उत्तर भारतीय आणि उत्तर भारतीय (North Indian) संघटनांचे प्रमुख पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार आहेत. आज रात्री 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक आणि उत्तर भारतीय आघाडीचे विक्रमप्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उत्तर भारतीय बांधवांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करून त्यांना तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावर स्थापन झालेल्या युती सरकारला पाठिंबा दिला जाणार आहे.

उत्तर भारतीय एकनाथ शिंदेंना पाठिंबा

मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर सह एमएमआर क्षेत्रातील हजारो उत्तर भारतीय आणि उत्तर भारतीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार आहेत. आज रात्री 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेणार आहेत. प्रताप सरनाईक आणि उत्तर भारतीय आघाडीचे विक्रमप्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे.

हे सुद्धा वाचा

“एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेऊन ‘सब का साथ, सब का विकास’ यापद्धतीने काम केले आहे. त्यांनी याआधी 2 वेळा अयोध्या दौरा केला होता त्यात त्यांच्यासह हजारो उत्तर भारतीय जमले होते यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे रामभक्त सर्व उत्तर भारतीय समाजाचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत आहे”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.