MNS : ज्या महिलेला शिवीगाळ मनसेच्या माणसांनी बोरिवलीत त्याच महिलेच्या हातून गुजराती टेलरला फटकावलं

MNS : या निवडणुका संपल्यानंतरही मराठीचा मुद्दा इतक्यात तरी थंड होणार नसल्याचं दिसतय. बोरिवलीमध्ये एका मराठी महिलेच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका गुजराती पुरूषाला चोप दिला.

MNS : ज्या महिलेला शिवीगाळ मनसेच्या माणसांनी बोरिवलीत त्याच महिलेच्या हातून गुजराती टेलरला फटकावलं
MNS
| Updated on: Jan 23, 2026 | 3:43 PM

नुकताच मागच्या आठवड्यात मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवर ही निवडणूक करण्याचा प्रयत्न झाला. त्यात ठाकरे बंधुंना काही प्रमाणात यश मिळालं. मराठी बहुल वस्त्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी ठरले, तर उपनगरात भाजपला यश मिळालं. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेन मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला होता. मराठीच्या मुद्यावर होणारी ही शेवटची निवडणूक आहे. मराठी माणसाने त्याच्या अस्तित्वासाठी, हक्क आणि अधिकारांसाठी भरभरुन मतदान करावं असं आवाहन उद्धव ठाकरे शिवसेना-मनसेकडून करण्यात आलं. त्याला शिवडी, वरळी, दादर, प्रभादेवी, भांडूप, विक्रोळी या मराठी पट्ट्यात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.

या निवडणुका संपल्यानंतरही मराठीचा मुद्दा इतक्यात तरी थंड होणार नसल्याचं दिसतय. बोरिवलीमध्ये एका मराठी महिलेच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका गुजराती पुरूषाला चोप दिला. ज्या महिलेवर अन्याय झाला, तिच्याच हाताने त्या पुरुषाची धुलाई करण्यात आली. मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

अर्वांच्य भाषेत शिवीगाळ

हल्ल्यानंतर मनसेच्या किरण नकाशे आणि विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मनसे विधानसभा अध्यक्ष किरण नकाशे म्हणाले की, मराठी माणसाची बाजू घेतली म्हणून मनसेच्या किरण नकाशे आणि विजय पाटील यांच्यावर गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. बोरीवली एक्सर गावात राहणाऱ्या स्थानिक महिला वैशाली म्हात्रे यांना तेथील अमराठी लेडीज टेलर अर्वांच्य भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत होता. बरेच दिवस समजावून पण न समजल्याने ताईंनी मनसेच्या शाखेत धाव घेतली. पुढील ज्या ताईंवर अन्याय झाला तिच्याच हाताने या गुजराती टेलरची धुलाई करण्यात आली. या प्रकरणात मनसेचे किरण नकाशे आणि विजय पाटील यांच्या वर एम एच बी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.