AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेत कार्यालयासाठी ठाकरे-शिंदे गट आमनेसामने

Thacekeray and Shinde Group : ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

मुंबई महापालिकेत कार्यालयासाठी ठाकरे-शिंदे गट आमनेसामने
Mumbai news, Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 28, 2022 | 6:33 PM
Share

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करतायेत. अनेकदा तर दोन्ही गट हे आमनेसामनेही आले आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील प्रभादेवीत दहीहंडीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची पहायला मिळाली होती. मात्र आता पुन्हा एकदा दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. मुंबई महापालिकेतील कार्यलयासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहे. या दरम्यान दोन्ही गटांमध्ये हमरीतुमरी पहायला मिळाली. तसेच कोणताही पेचप्रसंग उद्भवू नये यासाठी मुंबई पोलिसांनीही मध्यस्थी केली आहे. पालिकेतील ठाकरे गटाच्या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. यानंतर ठाकरे गटही आक्रमक झाले आहेत.(maharashtra politics eknath shinde group leaders entire bmc head office)

ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांची प्रतिक्रिया

“शिंद गटाचे काही खासदार आणि नगरसेवक हे जाणीवपूर्व कुरापती काढण्याचे प्रकार करतायेत. मुंबई महापालिकेतील कार्यालय आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात आहे. आमच्या माजी महापौर, नगरसेवक नियमीतपणे तिथं बसतात. पण खासदार राहुल शेवाळे यांनी बेशिस्तपणाची वागणूक करुन, ठाण्याचे नरेश मस्के यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही”, अशी रोखठोक भूमिका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मांडली.

“त्यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय तो निषेधार्थ आहे. लोकं उभं करुन, कार्यालयात घुसून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पक्षाचे मुख्यमंत्री आहे. त्यांच्या गटाच्या माणसांनी अशाप्रकारे कायदा-व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही”, असंही राऊत यांनी नमूद केलं.

आगाऊपणा करतील तर

“तसेच आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र जमा झालेत. त्यांनी म्हणजेच शिंदे गटाने आगाऊपणा केला तर जशास तसं उत्तर देऊ”, असा इशाराही राऊत यांनी शिंदे गटाला दिला.

शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.