पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करा, नसीम खान यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्रं; काँग्रेसचं दबाव तंत्र?

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्यानंतर आता काँग्रेसने राज्यात दबाव तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करा, नसीम खान यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्रं; काँग्रेसचं दबाव तंत्र?
naseem khan

मुंबई: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्यानंतर आता काँग्रेसने राज्यात दबाव तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते नसीम खान यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्रं लिहून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. आधीच भाजपनेही राज्य सरकारने इंधनाची दरवाढ कमी करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यात आता काँग्रेसनेही मागणी लावून धरल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली असून सामान्य जनतेला या महागाईने जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याचपद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मोदी सरकारमुळे प्रचंड हाल

केंद्र सरकारने मागील सात वर्षात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून 100 रुपये प्रति लिटर रुपयांच्यावर गेले आहेत. एलपीजी गॅसही 900 रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर वस्तुंच्या किमती वाढतात, प्रवासाचा खर्चही वाढतो. कोरोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

congress latter

congress latter

आर्थिक कोंडी आहे पण…

पेट्रोल डिझेलवरील कर रुपाने राज्याला मिळणारा पैसा केंद्र सरकार वेळेवर देत नाही. त्यातच सेसच्या पैशातील हिस्सा राज्यांना मिळतच नाही तो फक्त केंद्र सरकारलाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी होत आहे. परंतु जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. राज्यातील जनतेच्या हितासासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

 

संबंधित बातम्या:

‘इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, तिकडे आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी’, अतुल भातखळकरांची खोचक टीका

VIDEO: एसटी संपावर फडणवीस-परब यांच्यात चर्चा, तोडग्यांचा फॉर्म्युला परब देणार, पगारवाढीचा मुद्दा कसा सुटणार?

कोरोनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान, ‘ब्रीज कोर्स’ची आखणी करण्याची रोहित पवार यांची मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI