AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसह महाराष्ट्र गारठणार? पुणेकरांसाठीही हवामान खात्याचा इशारा

पुढच्या दोन दिवसांत थंडीचा पारा आणखी वाढेन असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह महाराष्ट्र गारठणार? पुणेकरांसाठीही हवामान खात्याचा इशारा
| Edited By: | Updated on: Dec 18, 2020 | 9:25 AM
Share

पुणे : राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी आता परत आली आहे. मुंबईसह, पुण्यात थंढीचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे हवेतीला गारवा आणखी वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र, आता शहरात किमान तापमानात हळूहळू घट व्हायला सुरुवात झाली आहे. तर पुढच्या दोन दिवसांत थंडीचा पारा आणखी वाढेन असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. (maharashtra weather alert cold weather in mumbai pune marathwada update)

आज शहरात सकाळी 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हलक्या प्रमाणात धूक्याची चादर पहायला मिळाली. पुढील काही दिवसात जोराची थंडी अनुभवायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. मात्र, मैदानावर व्यायाम करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. मैदानाला फेरफटका मारत चालत पुणेकर थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत.

खरंतर, मागच्या आठवड्यात राज्यभर पाऊस झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत पहाटे दाट धुकं पडल्याचं पाहायला मिळालं. येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यासह, विदर्भातील अनेक भागांत गारठा वाढणार आहे. गुरुवारी (ता. 17) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणी इथं 14.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.

अकोला शहरातही थंडी बरोबर धुक्याची दाट चादर पसरली आहे. आज सकाळपासूनच शहर आणि ग्रामीण भाग धुक्याखाली दडून गेल्याचं पाहायला मिळालं. सर्वत्र दाट धुकं असल्यामुळे नागरिक मिनी काश्मीरचा आनंद घेताना दिसत आहेत. (maharashtra weather alert cold weather in mumbai pune marathwada update)

इतर बातम्या –

महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा

Nagpur | नागपूरसह विदर्भात वाढणार थंडी, हवामान खात्याचा अंदाज

(maharashtra weather alert cold weather in mumbai pune marathwada update)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...