AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलणार? सत्तेतील बड्या पक्षाची प्रकाश आंबेडकर यांना खुली ऑफर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या नेत्याकडून खुली ऑफर देण्यात आलीय, त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय भूमिका मांडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी आजदेखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलणार? सत्तेतील बड्या पक्षाची प्रकाश आंबेडकर यांना खुली ऑफर
| Updated on: Oct 02, 2023 | 4:22 PM
Share

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युती झालीय. दोन्ही नेते गेल्यावर्षी एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढणार, अशी चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याची माहिती समोर आली होती. देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बहुसंख्य विरोधी पक्षांनी एकत्र येवून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण या विरोधकांनी प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत सहभागी करुन घेतलेलं नाही. इंडिया आघाडीच्या बैठकांचं प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण आलेलं नाही. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून अद्याप जागावाटप झालेलं नाही. महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष हे इंडिया आघाडीत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांचा मविआला इशारा

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला लवकर जागा वाटप करण्याची सूचना दिली आहे. नाहीतर आपण उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव निर्माण करुन युती करु, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

“उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आमची ठासणी झाली. बोलणी झाली. पण लग्नाची तारीख काढायला दोन भटजी आडवे येत आहेत. एकाचं नाव काँग्रेस, दुसऱ्याचं नाव एनसीपी आहे”, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केलीय. “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांसोबत जागा वाटपाबबात बोलत नाहीत. तसेच ते एकमेकांसोबत तडजोडही करत नाहीत. ते शिवसेनेसोबतही बोलणी करत नाही. त्यांनी असंच भिजत घोंगडं ठेवलं आहे”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांना महायुतीमधील बड्या पक्षाची ऑफर

इंडिया आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला आघाडीत सहभागी करुन न घेतल्यामुळे ते नाराज आहेत. याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केलीय. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वातं आहे. असं असताना आता महायुतीमधील मोठ्या पक्षाच्या नेत्याने प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांना नेमकी कुणी ऑफर दिली?

युतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी याबाबतचं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर अमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर सत्ताधारी शिवसेनेच्या सोबत गेले तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व गणितं बदलू शकतात. अर्थात याबाबतचा सर्वस्वी निर्णय प्रकाश आंबेडकर यांच्या हाती असणार आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.