महेश सुतार : वाशी खाडीत आत्महत्या करणाऱ्यांना जीवनदान देणारा देवदूत

| Updated on: Sep 15, 2020 | 7:24 PM

अनेक लोक वाशी खाडीवरील जुन्या पुलावरुन खाडीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. (Mahesh Sutar who save Suicide people in Vashi creek)

महेश सुतार : वाशी खाडीत आत्महत्या करणाऱ्यांना जीवनदान देणारा देवदूत
Follow us on

नवी मुंबई : ज्या खाडीच्या पाण्यावर आपले जीवन अवलंबून आहे, त्या खाडीत मृत्यू शोधत माणसे येतात. हे पाहून एका तरुणाने त्यांना वाचवणे हेच आपले जीवनकार्य मानले आहे. हा तरुण वाशी परिसरातील कौतुकाचा विषय ठरला आहे. नवी मुंबईतील वाशी गावच्या महेश अशोक सुतार असे त्याचे नाव आहे. (Mahesh Sutar who save Suicide people in Vashi creek)

एका मच्छीमाराचा हा मुलगा. दर्याच्या छाताडावर पाय रोवून उभे राहणाऱ्या या माणसाने अनेक निराश व्यक्तींना नवे जीवन, नवी आशा दिली आहे. पाण्याबाहेर काढल्यावर मासा तडफडतो तसे माणूस आत्महत्येसाठी पाण्यात उडी घेतल्यावर हात-पाय मारू लागतो. संसाराच्या सागरात गटांगळ्या खाणाऱ्या अनेकांना वाचवून नवी उमेद देणाऱ्या महेश सुतार यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. या पुरस्कारातून समाजाने त्यांच्याविषयीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक लोक वाशी खाडीवरील जुन्या पुलावरुन खाडीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. मासेमारी करत असलेला हा तरुण त्यांना जिवाच्या आकांताने वाचवतो.

नवी मुंबईतील वाशी खाडीपूल म्हणजे आत्महत्येचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या पुलावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करतात. यातील अनेक लोकांना वाचविणाऱ्यांमध्ये वाशी गावातील मच्छिमारांमध्ये महेश अशोक सुतार हे एक चांगले व्यक्तिमत्व आहे. (Mahesh Sutar who save Suicide people in Vashi creek)

संबंधित बातम्या :

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, थर्मल स्कॅनिंग, मास्कशिवाय प्रवास

मराठा आरक्षणासोबत मुस्लीम आरक्षणाचाही अध्यादेश काढा, काँग्रेसच्या माजी आमदाराची अशोक चव्हाणांना मागणी