मराठा आरक्षणासोबत मुस्लीम आरक्षणाचाही अध्यादेश काढा, काँग्रेसच्या माजी आमदाराची अशोक चव्हाणांना मागणी

मराठा आरक्षणाच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या 5 टक्के मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश देखील काढावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे (Congress MLA demand ordinance for Muslim reservation ).

मराठा आरक्षणासोबत मुस्लीम आरक्षणाचाही अध्यादेश काढा, काँग्रेसच्या माजी आमदाराची अशोक चव्हाणांना मागणी

नाशिक : एकीकडे मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलं असून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याचा सल्ला सरकारला दिला. त्यानंतर आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही समोर येत आहे. मराठा आरक्षणापाठोपाठ मुस्लीम आरक्षणाचीही मागणी होत आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या 5 टक्के मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश देखील काढावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे (Congress MLA demand ordinance for Muslim reservation ).

मालेगावमधील काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून याबाबतची मागणी केली आहे. 2014 मध्ये राज्य सरकारने मराठा समाजासह मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते. मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्षणामध्ये मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं आरक्षण कायम ठेवले होतं. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाबरोबर मुस्लीम आरक्षणाचाही विचार करत अध्यादेश काढावा अशी मागणी मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केलीय. या मागणीचे एक पत्र मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक चव्हाण यांना पाठवण्यात आले आहे.

आसिफ शेख म्हणाले, “महाराष्ट्राच्या लोकशाही आघाडीने 2014 मध्ये मराठा समाजाला आणि मुस्लीम समाजाला सरकारी नोकरीत, शिक्षणात आरक्षण देण्याचं काम केलं. यानंतर दोन्ही समाजाच्या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मराठा आरक्षणाचं प्रकरण आजही सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. सरकार त्यावर अध्यादेश काढण्याचं काम करत आहे. त्यासाठी मी राज्य सरकारचं स्वागत करतो.”

“मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लीम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षणाचा जो निर्णय दिला होता. त्याकडे भाजप सरकारने दुर्लक्ष केलं होतं. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार आणि जयंत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मराठा समाजासोबतच मुस्लीम आरक्षणाचाही अध्यादेश काढावा. यातून मराठा समाजासोबतच मुस्लीम समजालाही आरक्षण द्यावं,” असंही त्यांनी नमूद केलं.

मुस्लीम समाजातही नाराजी तयार होत आहे. लोक आम्हाला प्रश्न विचारु लागले आहेत. त्यामुळे सरकारने दोन्ही आरक्षणाचे अध्यादेश सोबत काढून दोन्ही समाजाला न्याय द्यावा.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंनी हिमतीनं सांगावं 5 टक्के मुस्लिम आरक्षण देणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुस्लिम आरक्षणावरुन विसंवाद, मुख्यमंत्री म्हणातात अद्याप चर्चा नाही, तर आरक्षणासाठी आम्ही बांधील, काँग्रेसची भूमिका

“हिंदुत्ववादी शिवसेनेचा मुस्लिम आरक्षणाचा विचार दुर्भाग्यपूर्ण, आरक्षण दिल्यास आंदोलन करु”

संबंधित व्हिडीओ :

Congress MLA demand ordinance for Muslim reservation

Published On - 5:08 pm, Mon, 14 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI