मुस्लिम आरक्षणावरुन विसंवाद, मुख्यमंत्री म्हणातात अद्याप चर्चा नाही, तर आरक्षणासाठी आम्ही बांधील, काँग्रेसची भूमिका

अध्यादेश काढून मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देऊ  (Controversy over Muslim reservation) अशी घोषणा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

मुस्लिम आरक्षणावरुन विसंवाद, मुख्यमंत्री म्हणातात अद्याप चर्चा नाही, तर आरक्षणासाठी आम्ही बांधील, काँग्रेसची भूमिका

मुंबई : मुस्लिम आरक्षणावरुन महाविकास आघाडीत विसंवाद असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण अध्यादेश काढून मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देऊ  (Controversy over Muslim reservation) अशी घोषणा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र आरक्षणाबाबत अद्याप कोणतीही चर्चाच झाली नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. त्याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही दुजोरा दिला. तर दुसरीकडे मुस्लिम आरक्षणासाठी बांधील असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. (Controversy over Muslim reservation)

ही सर्व परिस्थिती पाहता कुठेतरी महाविकास आघाडीत मुस्लिम आरक्षणावरुन विसंवाद आहे की काय असा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अजून आलेला नाही. त्याबद्दल कोणती चर्चाही झालेली नाही. माझी मुख्यमंत्री आणि शिवसेना म्हणून कोणतीही भूमिका अजून मुस्लिम आरक्षणा संदर्भात स्पष्ट करण्यात आलेली नाही. ज्यावेळी मुद्दा येईल त्यावेळी बोलेन. नम्रपणे सांगतो जे आदळआपट करत आहे त्यांनी ताकद वाया घालवू नक”

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुस्लिम आरक्षणाचा विषय काँग्रेसच्या राजवटीत घेण्यात आला होता, आम्ही त्या निर्णयाला आजही बांधील  आहोत. हा विषय  तिन्ही पक्षाचा असल्यामुळे चर्चा करुन निर्णय घेऊ. निर्णय आम्ही घेतलाच होता. आमच्यात दुमत किंवा  विसंवाद नाही, बरेचशे विषय असे असतात की समनव्यातून मार्ग काढावा लागतो, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मुस्लिम आरक्षण देणे हे आमचं वचन आहे. मुस्लिमांना आम्ही यापूर्वी पाच टक्के आरक्षण दिले होते. आरक्षणावर अद्याप चर्चा झाली नाही हे खरं आहे. समन्वय समितीमध्ये बैठक होईल, चर्चा होईल. आम्ही जनतेला आश्वासित केलं आहे, 5 टक्के आरक्षण देऊ. आमचं वचन आहे, आम्ही देऊ, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

नवाब मलिक काय म्हणाले होते?

मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी 28 फेब्रुवारीला दिली होती. मुस्लिम आरक्षण देण्याबाबत 2014 ला जसा अध्यादेश होता, तसाच अध्यादेश काढून कायद्यात रूपांतर करू किंवा मुस्लिम आरक्षणबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे, ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लिम आरक्षण देण्याबाबत कायदा करु आणि निर्णय घेऊ. शैक्षणिक आरक्षणाबाबत कायदा करुन आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय घेऊ, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले होते.

देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप

महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला शिक्षणात देऊ केलेल्या 5 टक्के आरक्षणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Muslim reservation) यांनी आक्षेप घेतला आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. इतकंच नाही तर धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षण दिल्याने मराठी आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल, असं फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या 

मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

धर्माच्या आधारे मुस्लिम आरक्षण देता येणार नाही, मराठा आणि ओबीसी आरक्षण अडचणीत येईल : फडणवीस 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI