फटाक्यांमुळे वसईत केमिकल आणि पुठ्ठ्यांच्या गोदामाला भीषण आग

  • Namdev Anjana
  • Published On - 16:34 PM, 7 Nov 2018
फटाक्यांमुळे वसईत केमिकल आणि पुठ्ठ्यांच्या गोदामाला भीषण आग

वसई (ठाणे) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रिचर्ड कंपाऊंडमधील दोन कंपन्याना भीषण आग लागली होती. ही आग फटाक्यांमुळे लागली असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील रिचर्ड कंपाऊंडमध्ये आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत केमिकल आणि पुठ्ठ्याचं गोदाम जळून खाक झाले. आगीनंतर गोदाम जळून पूर्णपणे खाक झालं.

वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर दीड तासात नियंत्रण मिळवलं. या आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगाराचं साहित्य होतं. तर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गोदामं होती. ही सर्व गोदामे, दुकाने अनधिकृतरित्या वसलेली होती. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षायंत्रणा कोणतीच नव्हती.

फटाक्याच्या ठिणगीने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.