AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई हादरली! विवाहित महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला अन्… एकाला अटक

Mumbai Crime : मुंबईतील एका विवाहित महिलेला तिचा अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून तिच्याकडून लाखो रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबई हादरली! विवाहित महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला अन्... एकाला अटक
Women VideoImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 22, 2026 | 6:39 PM
Share

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विवाहित महिलेला तिचा अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून तिच्याकडून लाखो रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. या व्यक्तीने इतरही अनेक महिलांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला अन्…

मुंबईतील मालवणी पोलिसांनी एका अशा व्यक्तीला अटक केली आहे, जो फेसबुकवर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, त्यांच्याशी ऑनलाइन चॅट करून आणि तिचे तिच्या नवऱ्याशी आणि सासूशी पटत नाही असे भविष्यवाणी करून तिचा विश्वास जिंकायचा आणि मग तिला कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवायचा. अशीच एक महिला त्याच्या जाळ्यात अडकली. त्याने महिलेचा विश्वास जिंकून तिला मार्वे बीचवर फिरायला बोलावले, तिच्या जवळ गेला आणि त्यांच्यासोबतचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

महिलेकडून 33 लाख रुपये उकळले

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेकडून तिच्या अश्लील व्हिडिओच्या नावाखाली 33 लाख रुपये घेतले होते, त्यानंतर महिलेला आपल्यासोबत काहीतरी चुकीचे घडत असल्याचे लक्षात आले. 18 तारखेला आपली चूक लक्षात आल्यावर त्या महिलेने आपल्या पतीला आत्महत्येचा संदेश पाठवला, त्यानंतर तिचा पती घरी आला आणि पत्नीची संपूर्ण कहाणी ऐकून त्याने मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला.

आरोपीला अटक, कारवाई होणार

याबाबत बोलताना मालवणी पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक दीपक जमदाडे यांनी सांगितले की, आरोपी भोंदूबाबा किंवा ज्योतिषी नाही आहे. तो मीरा रोड येथे राहणारा एक ड्रायव्हर आहे. त्याने फेसबुकवर महिलेशी मैत्री केली आणि नंतर, तिला बाहेर घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला, तिच्याकडून 33 लाख रुपये घेतले आणि तिला ब्लॅकमेल करत होता. आता आरोपीला अटक करण्यात आली आहे या आरोपीचे नाव अमर महागावकर आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!