जाहिरातीतून महिलांचं चारित्र्यहनन, शिवसेना नेत्या मनिषा कायंदेंचा आंदोलनाचा इशारा

| Updated on: Aug 11, 2021 | 7:32 PM

झुरळ मारण्यासाठीच्या औषधाची जाहिरात करणाऱ्या एका कंपनीने जाहिरातीतून महिलांचं चारित्र्य हनन केलं आहे. त्यामुळे या कंपनीने जाहिरातीचे प्रेक्षपण थांबवून महिला वर्गाची माफी मागावी. (manisha kayande)

जाहिरातीतून महिलांचं चारित्र्यहनन, शिवसेना नेत्या मनिषा कायंदेंचा आंदोलनाचा इशारा
manisha kayande
Follow us on

मुंबई: झुरळ मारण्यासाठीच्या औषधाची जाहिरात करणाऱ्या एका कंपनीने जाहिरातीतून महिलांचं चारित्र्य हनन केलं आहे. त्यामुळे या कंपनीने जाहिरातीचे प्रेक्षपण थांबवून महिला वर्गाची माफी मागावी, अन्यथा शिवसेनेच्या रणरागणिनी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या डॉ. मनिषा कायदें यांनी दिला आहे. (manisha kayande objection to lakshman rekha advertisement)

मनिषा कायंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. लक्ष्मणरेखा या झुरळाला मारणाऱ्या कीटकनाशक कंपनीने त्यांच्या जाहिरातीत केलेले स्त्रियांच चारित्र्यहनन ही बाब नक्कीच अपमानास्पद आहे. याबाबत सदर कंपनीने समस्त स्त्री वर्गाची लेखी माफी मागावी, तसेच त्या जाहिरातीवर बंदी आणावी, अशी लेखी तक्रार कायंदे यांनी थेट अॅडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाकडे केली आहे.

लक्ष्मणरेखा या झुरळांना मारणाऱ्या कीटकनाशक कंपनीने अलीकडेच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत एक महिला झुरळाला खूपच घाबरते. झुरळाला पाहून नवऱ्यासमोरच तिच्या घरात काम करत असलेल्या सुताराच्या अंगावर उडी मारते असे चित्रण करून स्त्रियांच चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या वस्तूची जाहिरात करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. परंतु कोणत्याही जातीचा, धर्माचा अथवा लिंगाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. मग या कंपनीने स्त्रियांच चारित्र्यहनन करण्याचा अधिकार कोणी दिला?, कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

ही तर हीन प्रवृत्ती

या जाहिरातीचे थेट प्रक्षेपण त्वरित थांबवण्यात यावे. अन्यथा हे उत्पादन बनविणाऱ्या कंपनीविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. “झुरळ पाहिल्यावर एक महिला तिथे काम करत असलेल्या सुताराच्या अंगावर उडी मारते व तो तिला अलगद झेलतो. हे सर्व तिचा नवरा पाहत असतो. अशी जाहिरात निर्मिती करणं हे कंपनीच्या हीन प्रवृत्तीचे द्योतक आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

महिलांना दुबळी दाखवण्याचा प्रयत्न

या कंपनीच्या उत्पादनाचे नाव ” लक्ष्मणरेखा ” असून रामायण ग्रंथामध्ये लक्ष्मणरेषा संकल्पनेला पावित्र्य आहे. याच नावाने आपले उत्पादन करीत असलेल्या या कंपनीने समस्त महिला वर्गाचा या जाहिरातीत अपमान केला आहे. हीच जाहिरात एखादा पुरुष घाबरला व त्याने सुताराला मिठी मारली असे दाखवून सुद्धा उत्पादनाची महानता दाखविली गेली असती. परंतु समस्त महिला वर्गाला दुबळी दाखवून पुरुषाचा अहंकार जोपासण्याचा व त्याला रक्षणकर्ता दाखवण्याचा प्रयत्न जाहिरातीत केला आहे, असं त्या म्हणाल्या.

महिला आघाडी शांत बसणार नाही

आज एकविसाव्या शतकात स्त्री पुरुष समान नाहीत हे या जाहिरातीत अधोरेखीत केले आहे. मीरा कुमारी सारख्या भारतीय महिला ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकून देशाचं नाव जगात रोषण करतात. असे असताना या जाहिरातीत महिलांना कमकुवत दाखवून आपले उत्पादन विकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. शिवसेनेची महिला आघाडी महिलांचा अपमान कदापि सहन करणार नाही. सदर कंपनीने जाहिरातीचे प्रक्षेपण त्वरित न थांबवल्यास या जाहिरातदारांना आम्ही योग्य तो धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असं त्या म्हणाल्या. (manisha kayande objection to lakshman rekha advertisement)

 

संबंधित बातम्या:

शाळा-कॉलेज सुरु करण्यावर अवघ्या 24 तासात ब्रेक, आज-उद्या अंतिम निर्णय अपेक्षित, टास्क फोर्सचा विरोध का?

अशोकराव, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा; चंद्रकांतदादांचे आव्हान

हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, पण अटी आणि शर्थी लागू, वाचा काय आहेत नियम ?

(manisha kayande objection to lakshman rekha advertisement)