AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, पण अटी आणि शर्थी लागू, वाचा काय आहेत नियम ?

मुंबई : राज्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिलीकरणाविषयी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्स रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात आली असली तरी त्यासाठी सरकारने […]

हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, पण अटी आणि शर्थी लागू, वाचा काय आहेत नियम ?
| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 7:00 PM
Share

मुंबई : राज्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिलीकरणाविषयी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्स रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात आली असली तरी त्यासाठी सरकारने अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. (maharashtra cabinet ministers meeting decision today hotels and restaurants can remain open upto 10 pm information given by rajesh tope)

रेस्टॉरंट्स सुरु, मात्र नियम काय ?

रेस्टॉरंट्स सुरु करायचे असतील तर काय आणि कोणती काळजी घेतली गेली पाहिजे याबद्दल राजेश टोपे यांनी सविस्तर सांगितलं आहे. “जे लोक जेवणासाठी आलेले असतील त्यांना वेटिंग पिरयडमध्ये मास्क घालणे बंधनकारक असेल. पूर्ण उपहारगृह सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. वेटर्सनेसुद्धा मास्क वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था ही सोशल डिस्टन्सिंगचा नियम लक्षात घेऊनच केलेली असावी. सर्व कर्मचारी तसेच मॅनेजमेंटने कोरोना लसीचा डबल डोस घेतलेला असणे गरजेचे आहे. या अटीशर्तीची पूर्तता केली असेल तरच रेस्टॉरंट्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

खासगी कार्यलये 24 तास सुरु ठेवण्यास परवानगी

खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर 100 टक्के उपस्थितीनं काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असेल.

सिनेमागृहे, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे बंदच  

सर्व दुकानांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच इनडोअर स्पोर्टस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खेळाडू आणि चालकांसह सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं अनिवार्य आहे.

इतर बातम्या :

Uddhav Thackeray Cabinet: मोठी बातमी, मुंबईतील हॉटेल चालकांच्या लढ्याला यश, रात्री 10 पर्यंत राज्यातील हॉटेल सुरु, ठाकरे सरकारचा निर्णय

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

अजोय मेहतांचा नरिमन पॉईंट परिसरात अलिशान फ्लॅट, ईडीने बिल्डरचा जबाब नोंदवला, अविनाश भोसले प्रकरणाची देखील चौकशी

(maharashtra cabinet ministers meeting decision today hotels and restaurants can remain open upto 10 pm information given by rajesh tope)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.