Uddhav Thackeray Cabinet: मोठी बातमी, मुंबईतील हॉटेल चालकांच्या लढ्याला यश, रात्री 10 पर्यंत राज्यातील हॉटेल सुरु, ठाकरे सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थितीत असून त्यांच्या उपस्थितीत हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray Cabinet: मोठी बातमी, मुंबईतील हॉटेल चालकांच्या लढ्याला यश, रात्री 10 पर्यंत राज्यातील हॉटेल सुरु, ठाकरे सरकारचा निर्णय
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 6:24 PM

मुंबई : कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरु झाली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थितीत असून त्यांच्या उपस्थितीत हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. या निर्णयामुळे हॉटेलचालकांच्या लढ्याला यश आलंय. 15 ऑगस्टपासून हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत, असा निर्णय घेण्यात आलाय.

राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असून हॉटेल चालकांना  दिलासा देणारा निर्णय घेण्यात असल्याची  सूत्रांची माहिती आहे. हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. कमी आसनक्षमतेच्या अटीसह हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांपैकी आरोग्यमंत्री राजेश टोपे किंवा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

मॉल्स आणि चित्रपट गृहांबाबत काय निर्णय?

तर दुसरीकडे मॉल्स आणि चित्रपटगृहे यांच्या बाबत राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यासंदर्भातील कोणातही निर्णय अद्याप समोर आलेला नाही.

आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी समिती

सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा‌ अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याचं कळतंय.  सामान्य प्रशासन विभागाच्या सुजाता सौमिक‌ या चाय अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.आरक्षणाबाबात कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास‌ ही समिती करणार आहे. यानंतर नोकरीतल्या आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षण, एसईबीसी आरक्षण यासंदर्भात‌ कोर्टाच्या निर्णयाचा‌ ही समिती अभ्यास करणार असल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळापुढील चर्चेचे विषय:

मंत्रिमंडळ सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत खालील विषयांवर चर्चेची शक्यता असल्याचं समजतंय.

> 3 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचे कार्यवृत्त कायम करणे >> राज्यातील पीक-पाणी परिस्थितीचा आढावा >> कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा आणि सादरीकरण >> नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रीत) या संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याबाबत >> भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव सादरीकरण

इतर बातम्या:

Maharashtra cabinet meeting decision today taken by CM Uddhav Thackeray cabinet Mahavikas aaghadi to extend hotel opening time to 10 pm

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.