AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठ्या घडामोडी, ‘सह्याद्री’वर खलबतं, तोडगा निघणार?

मराठा आरक्षणासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे आता मोठ्या हालाचाली घडत आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलीय.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठ्या घडामोडी, 'सह्याद्री'वर खलबतं, तोडगा निघणार?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 08, 2023 | 10:15 PM
Share

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची मुंबईत आज रात्री साडेदहा वाजता बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीसाठी मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ जालन्याहून मुंबईसाठी रवाना झालंय. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यासोबत हे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झालंय. या शिष्टमंडळाने संभाजीनगर विमानतळापर्यंत रस्ते मार्गाने प्रवास केला. त्यानंतर संभाजीनगर विमानतळाहून विशेष विमानाने हे शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेला रवाना झालं. या शिष्टमंडळाची संभाजीनगर येथे बैठक पार पडली. त्यानंतर हे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झालं. आता हे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालंय. या शिष्टमंडळाची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे.

मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची आज रात्री साडेदहा वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे सरकारसोबत बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावेत यासाठी शिष्टमंडळाची समजूत काढली जाण्याची शक्यता आहे.

शिष्टमंडळ जीआरमध्ये दुरुस्ती सूचवणार

मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा नागरिकांसाठी जीआर काढलाय. पण या जीआरमध्ये जुन्या नोंदींमध्ये कुणबी वंशावळ असेल तर मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र दिलं जाईल, असं म्हटलं आहे. पण मनोज जरांगे यांची सर्वांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी, अशी मागणी केलीय. याबाबत मनोज जरांगे यानी दुरुस्ती सूचवली आहे.

राज्य सरकारने जीआर काढल्यानंतर अर्जुन खोतकर मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी राज्य सरकारचा जीआर जरांगे यांना वाचून दाखवला होता. जरांगे यांनी त्या जीआरमध्ये दुरुस्ती सूचवली होती.त्यावर खोतकर यांनी दुरुस्ती सूचवायची असेल तर मुंबईत यावं लागेल, असं सांगितलं होतं. त्यावर जरांगे यांनी आमचं शिष्टमंडळ येईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर आज मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांना जीआरवर तोडगा सूचवणार आहे. त्यावर मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल