AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: आमच्या दोघांची नार्को टेस्ट करा… मनोज जरांगे पाटीलांनी टाकला मोठा डाव… आता कुणाविरोधात उघडला मोर्चा?

Manoj Jarange Demand Narco Test: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रणरणत्या उन्हात आंदोलन केले. सरकार दरबारी मोठ्या हालचालीनंतर रात्री उशीरा त्यांनी उपोषण मागे घेतले. पण त्याचवेळी त्यांनी जुन्या प्रतिस्पर्ध्याला ललकारले. काय आहे मोठी अपडेट?

Manoj Jarange: आमच्या दोघांची नार्को टेस्ट करा... मनोज जरांगे पाटीलांनी टाकला मोठा डाव... आता कुणाविरोधात उघडला मोर्चा?
मनोज जरांगे पाटील Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 31, 2026 | 9:38 AM
Share

Manoj Jarange on Chhagan Bhujbal: गेल्या दहा महिन्यांपासून सरकारने मराठा आरक्षणाविषयीच्या काही मुद्यांची प्रक्रिया पूर्ण न केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर 30 मे रोजी रणरणत्या उन्हात त्यांनी आमरण उपोषण केले. सरकारने युद्धपातळीवर काही मागण्या मंजूर केल्या तर काही मागण्यांसाठी कालावधी वाढवून घेतला. मंत्री राधाकृषअम विखे पाटील यांची शिष्टाई कामी आली. जरांगे पाटील यांनी उपोषण संपवले. त्याचवेळी त्यांनी जुन्या प्रतिस्पर्ध्याला ललकारले. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता थेट वर्मी बाण सोडला.

दोघांची नार्को टेस्ट करा

रखरखत्या उन्हात मराठा आरक्षणासंदर्भातील काही मागण्यांवर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला काल सकाळी 10 वाजता सुरूवात केली. थोड्याच वेळांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने धाव घेतली. त्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारची भूमिका मांडली. पण त्यावर जरांगेंचं समाधान झालं नाही. त्यांनी काही मागण्यांचा आग्रह धरत उपोषण मागे घेण्यास नकार दिला. रात्री पुन्हा विखे पाटील यांनी शिष्टाई केली. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्याचवेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला

ही माझी मागणी नाही विनंती आहे एक जण माझ्या विरोधात आहे मी त्याच्याविरोधात आहे आमच्या दोघांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी त्यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता केली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासमोरच त्यांनी भुजबळ आणि आपली नार्को टेस्ट करा असे म्हणताच कार्यकर्त्यांनी ही मागणी उचलून धरली. उपोषण सोडतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या या अचानक मागणीने दोन्ही नेते अवाक झाले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांचा जुना वाद

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. ओबीसी आरक्षणात कुणाचीच घुसखोरी होऊ देणार नाही अशी भूमिका मंत्री छगन भुजबळांनी घेतली. तर मराठा हे कुणबीच असल्याने त्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे यावर मनोज जरांगे ठाम राहिले. त्यानंतर दोघांमध्ये मोठ्या शा‍ब्दिक चकमकी झाल्या. भुजबळांनी मराठवाड्यासह राज्यात काही ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव सभा घेतल्या. तर मनोज जरांगे पाटील यांनी थेट भुजबळांचा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीवेळी गाठला. या दोघांमधील वितुष्ट वाढले. त्यानंतर दोघांनी नमते घेत एकमेकांवर टीका करणे टाळल्याचेही दिसून आले. पण काल उपोषण सोडताना जरांगे पाटील यांना एकाएक छगन भुजबळ यांची आठवण आलीच. त्यांनी नाव न घेता दोघांच्या नार्को टेस्टची मागणी केली. त्यावर आता भुजबळ काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट