Mukesh Ambani bomb scare : अंबानींच्या घराबाहेरील संशयित गाडी प्रकरणाचा तपास एनआयए करणार

| Updated on: Mar 08, 2021 | 3:25 PM

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओतील स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. Mukesh Ambani bomb Scare NIA

Mukesh Ambani bomb scare : अंबानींच्या घराबाहेरील संशयित गाडी प्रकरणाचा तपास एनआयए करणार
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या गाडीचा तपास एनआयएकडे
Follow us on

मुंबई: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओतील स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा (Mansukh Hiren Death Case) तपास महाराष्ट्र एटीएस करणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याविषयी वृत्त दिलं आहे. हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र एटीएसनं देखील गुन्हा नोंद केला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक पोलीस स्टेशन मुंबई यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंद करुन तपासाला सुरुवात केली होती. (Mansukh Hiren death Case investigated by ATS and Mukesh Ambani bomb Scare case investigated by NIA)

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडेच

गृह विभाग,महाराष्ट्र शासन यांचे आदेशानुसार ठाणे शहर पोलीस यांचेकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे.त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यानुसार गु. र. क्र. 12/2021 भा.द.वि. कलम 302,201,34,120 B प्रमाणे विमला मनसुख हिरेन यांचे फिर्यादीवरून दहशतवाद विरोधी पथक पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसुख हिरेन यांच्या फोनचं लास्ट लोकेशन वसई

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील एक गूढ संपत नाही तोच दुसरं गूढ निर्माण होत असल्याने तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हिरेन यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन्स वसई गावात होते. त्यामुळे हिरेन ठाण्यावरून वसईत कशासाठी गेले होते? तिथे ते कुणाला भेटले? भेटलेल्या व्यक्तींशी काय चर्चा केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन शोधून काढले आहे. त्यानुसार बुधवारी रात्री साडे दहा वाजता ते वसईतील एका गावात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हिरेन वसईत कोणत्या गावात गेले? कशासाठी गेले होते? तिथे ते कुणाला भेटले? भेटलेल्या व्यक्तींशी काय चर्चा केली? असे सवाल केले जात असून याबाबतचं गूढ आणखीनच वाढलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या दिशेनेही तपास सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Mansukh Hiren Death Case | मृतदेह सापडला, शवविच्छेदन ते अंत्यसंस्कार, दिवसभरात काय काय घडलं?

Mansukh Hiren | मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, निष्पक्ष चौकशी व्हावी, पत्नी विमल हिरेन यांची प्रतिक्रिया

(Mansukh Hiren death Case investigated by ATS and Mukesh Ambani bomb Scare case investigated by NIA)