मोठी बातमी! अभिनयाच्या नावाखाली अनेक मुलांना डांबून ठेवलं, स्टूडिओबाहेर पोलिसांची गर्दी मुंबईत मोठा गोंधळ

मुंबईमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, दिवसाढवळ्या अनेक मुंलांना ओलीस ठेवण्यात आलं आहे, ही घटना आर ए स्टूडियोमध्ये घडली आहे.

मोठी बातमी! अभिनयाच्या नावाखाली अनेक मुलांना डांबून ठेवलं, स्टूडिओबाहेर पोलिसांची गर्दी मुंबईत मोठा गोंधळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2025 | 4:41 PM

मुंबईमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, दिवसाढवळ्या अनेक मुलांना ओलीस ठेवण्यात आलं आहे, ही घटना आर ए स्टूडियोमध्ये घडली आहे. या स्टूडियोच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे क्लास घेतले जातात. समोर आलेल्या माहितीनुसार इथे सकाळी 100 मुलं ऑडिशनसाठी आले होते, याचदरम्यान या स्टूडिओमध्ये काम करणाऱ्या आणि यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या रोहित आर्या याने 15 ते 20 मुलांना डांबून ठेवलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून या स्टूडिओमध्ये ऑडिशन सुरू होतं, आज देखील या स्टूडिओमध्ये ऑडिशनला सुरुवात झाली. 100 मुलं ऑडिशनसाठी आले होते. त्यातील 80 मुलांना रोहित आर्या याने घरी पाठवलं, पंरतु उर्वरीत सर्व मुलांना त्याने तेथील स्टूडिओच्या एका रूमध्ये बंद केलं, ही मुलं खिडकीमधून बाहेर डोकावत होती, दरम्यान मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर येताच स्टूडिओबाहेर एकच गोंधळ उडाला.

15 ते 20 मुलांना स्टूडिओमध्ये डांबून ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही बाजुनं स्टूडिओला वेढा टाकला. त्यानंतर पोलिसांनी या मुलांची अखेर आता सुटका केली असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तीन तास मुलांना डांबून ठेवलं

समोर आलेल्या माहितीनुसार आज या ठिकाणी ऑडिशन देण्यासाठी तब्बल 100 मुलं आली होती, त्यातील 80 मुलांना या रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं घरी पाठवलं तर अंदाजे 20 मुलांना या व्यक्तीनं एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. या घटनेनं मोठी खळबळ उडाली. या व्यक्तीनं 1 वाजेपासून ते 4 पर्यंत असं तब्बल तीन तास या मुलांना एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. मुलं जेवणासाठी आली नाहीत, म्हणून हा धक्कादायक प्रकार समोर आला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी आरोपीच्या तावडीमधून या मुलांची सुटका केली आहे. त्यामुळे पालकांच्या जीवात जीव आला आहे. आरोपीच्या मागण्या नेमक्या काय होत्या, आणि त्याने  मुलांना ओलीस का ठेवलं हे अजूनही अस्पष्ट आहे. घटनेबाबत तपास सुरू आहे, दरम्यान आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती आता समोर येत आहे.