AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Gunratna Sadavarte ची गाडी फोडणाऱ्यांचा आम्हाला आदर’, कुठल्या नेत्याने असं म्हटलं?

Maratha Reservation | महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय तापलाय. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलय. या दरम्यान सतत मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाची आज तोडफोड करण्यात आली. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलय.

'Gunratna Sadavarte ची गाडी फोडणाऱ्यांचा आम्हाला आदर', कुठल्या नेत्याने असं म्हटलं?
Gunaratna SadavarteImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2023 | 11:09 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची आज तोडफोड करण्यात आली. परळ येथील क्रिस्टल टॉवरखाली उभी असलेली गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्यात आली. गाडी फोडणारे एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत होते. गुणरत्न सदावर्ते सतत मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेत आहेत. त्याच रागातून ही तोडफोड झाल्याची शक्यता आहे. क्रिस्टल टॉवरखाली उभी असलेली गुणरत्न सदावर्ते यांची महागडी गाडी फोडण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे काय? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी विचारलाय. मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. झेपणार नाही आणि पेलणार नाही असं मनोज जरांगे म्हणत होते. ते हेच आहे काय? असा सवाल करतानाच मला कोणीच शांत करू शकणार नाही, असा इशाराच गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.

दरम्यान गुणरत्ने सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे नाहीत, असं मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक अमोल जाधवराव यांनी म्हटलय. “भावनेच्या भरात त्यांनी हे कृत्य केलं असेल, तर आम्हाला त्यांच्या भावनेचा आदर आहे. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत” असं, अमोल जाधवराव यांनी म्हटलय. “गुणरत्न सदावर्ते सतत मराठा समाजाविषयी गरळ ओकतात. क्लेशवाचक वक्तव्य का करतात?” असा सवाल अमोल जाधवराव यांनी विचारला. ‘आम्ही त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही’

“गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडणाऱ्या बांधवांचं आम्ही समर्थन करतो. कोणावरही गुन्हा दाखल करण्यात येवू नये. गुणरत्न सदावर्ते हा गरळ ओकण्याच काम करतोय. आम्ही त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्याचा बोलवत धनी कोण आहे आम्हाला माहिती आहे” मराठा समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी फोडाफोडीच समर्थन केलय.

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?