जगभरातील 50 सर्वश्रेष्ठ ब्रेकफास्टमध्ये मराठी ‘मिसळ’ चा समावेश, या 3 भारतीय पदार्थांची जगाला गोडी लागली

भारतातील पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थांची यादी मोठी आहे. यात जिभेचे चोचले पुरवणारे अनेक पदार्थ आहेत. हे पदार्थात भारतीय लोकसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती दिसते. त्यातील तीन खाद्य पदार्थांची निवड यंदाच्या जगातील 50 सर्वश्रेष्ठ ब्रेकफास्टमध्ये झाली आहे.

जगभरातील 50 सर्वश्रेष्ठ ब्रेकफास्टमध्ये मराठी मिसळ चा समावेश, या 3 भारतीय पदार्थांची जगाला गोडी लागली
| Updated on: Jun 11, 2025 | 10:42 PM

भारतातील जिभेचे चोचले पुरवणाऱ्या रेसिपीत मराठी माणसाला वडापाव नंतर नक्कीच झणझणीत मिसळही आवडत असेल. आता ही मिसळ जगातील 50 सर्वोत्कृष्ठ स्वादिष्ठ नाश्त्यात समाविष्ठ झाली आहे. भारतातील तीन खाद्यपदार्थांची 50 सर्वश्रेष्ठ ब्रेकफास्टमध्ये निवड झाली आहे. टेस्ट एट लास्ट या वेबसाईटने ही यंदाची यादी तयार केलेली आहे.

भारतातील उत्तरेतील सर्वोत्कृष्ट नाश्ता असलेले छोले भटुरे आणि  पराठा यांनाही  मिसळ पाव बरोबर यादीत स्थान मिळालेेल आहे. हे  नाश्त्यातील बहुतांशी भारतीयांचे आवडते पदार्थ आहेत. यांना पाहूनच तोंडाला पाणी सुटत असते. झणझणीत अगदी नाकातोंडातून पाणी काढणारी मिसळ चटकदार असते.  तर थेट तव्यावरून प्लेटमध्ये वाढल्या जाणाऱ्या गरम छोले भटुरेचा स्वाद कोण विसरले. या स्वादिष्ट पदार्थांमुळे भारतीयांची सकाळ चविष्ठ होत असते.  या तिनही पदार्थांना जगातील 50 सर्वोत्कृष्ठ स्वादिष्ठ नाश्त्यात स्थान मिळाले आहे.

 

येथे पोस्ट पाहा –

भारतीय खाद्य पदार्थांना आता जगात ओळख मिळत आहे. भारतीय नाश्त्यातील खाद्य पदार्थांना वर्ल्ड टेस्टअॅटलास्ट( world. TasteAtlas ) या फूड आणि ट्रॅव्हल गाईडने 50 सर्वश्रेष्ठ ब्रेकफास्टमध्ये स्थान मिळाले आहे. मिसळला या यादीत 18 वे स्थान मिळाले आहे. त्यानंतर पराठ्याला 23 वा क्रमांक मिळाला आहे तर छोले भटुरेला 32 वे स्थान मिळालेले आहे.