घाटकोपरमधील 2 कारखान्यांना भीषण आग, दोघांचा मृत्यू

| Updated on: Dec 28, 2019 | 9:56 AM

साकीनाका परिसरातील एका गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला (ghatkopar factory fire) आहे. तर एक जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

घाटकोपरमधील 2 कारखान्यांना भीषण आग, दोघांचा मृत्यू
Follow us on

मुंबई : घाटकोपर परिसरातील साकीनाका दोन कारखान्यांना लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला (ghatkopar factory fire) आहे. तर एक जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या आगीतील मृतांमध्ये एका महिलेचा आणि एका पुरषाचा समावेश आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं (ghatkopar factory fire) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (27 डिसेंबर) शुक्रवारी संध्याकाळी अंधेरीतील साकीनाका येथील खैराणी रोडजवळील दोन कारखान्यांना आग लागली. यात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या. तसेच आजूबाजूला अनेक छोटे कारखाने असल्याने ही आग वेगाने पसरत गेली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या, 2 वॉटर टँकर आणि 10 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले.

मात्र दाटीवाटीच्या परिसरामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणी येत होते. काल संध्याकाळी 5 च्या सुमारास लागलेल्या आगीवर तब्बल 6 तासांनी रात्री 11 वाजता नियंत्रण मिळवण्यात आले. यात भीषण अग्नितांडवात 30 ते 35 दुकाने जळून खाक झाली (ghatkopar factory fire) आहेत.

या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून आरती लालजी जैस्वाल (25) आणि पीयूष धीरज कातडीया( 42) अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. दरम्यान अद्याप एक व्यक्ती बेपत्ता आहे. बेपत्ता व्यक्तीचा अग्निशमन दल शोध घेत (ghatkopar factory fire) आहेत.