रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या (21 एप्रिल) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मांटुगा ते मुंलुड डाऊन धीम्या, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप-डाऊन आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात […]

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
लोकल ट्रेन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या (21 एप्रिल) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मांटुगा ते मुंलुड डाऊन धीम्या, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप-डाऊन आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरहेड वायर आणि सिग्नलसह इतर अन्य कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.20 ते संध्याकाळी 3.50 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. यामुळे सकाळी 10.57 ते संध्याकाळी 3.52 पर्यंत धिम्या मार्गावरील लोकल या जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. सीएसएमटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धीम्या मार्गांवरील सर्व लोकल गाड्या सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9.56 ते दुपारी 4.23 वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरगाव दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तर सीएसएमटी ते पनवेल सकाळी 9.53 ते दुपारी 2.44 अप- डाऊन वाहतूक बंद राहणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक 8 वरून पनवेलकरीता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सर्व लोकल या धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.