AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल, पवनकुमार बन्सल यांची भेटही देवरा यांनी घेतली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद देवरा?
| Updated on: Dec 17, 2020 | 3:07 PM
Share

मुंबई: काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष लवकरच बदलले जाणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आता जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची चर्चा सुरु आहे. त्यात आता मिलिंद देवरा यांनी मुंबई अध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. (Milind Deora’s lobbying for Mumbai Congress presidency)

मिलिंद देवरा यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल, पवनकुमार बन्सल यांची भेटही देवरा यांनी घेतली आहे. त्याचबरोबर देवरा हे राहुल गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं मिलिंद देवरा यांनी भाई जगताप, चरणसिंह सप्रा आणि सुरेश शेट्टी यांना मागे टाकत अध्यक्षपदासाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरु केल्याचं कळतंय.

देवरांनी यापूर्वीही भूषवलं अध्यक्षपद

मिलिंद देवरा हे 2019 मध्ये मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते. त्यांनी 7 जुलै 2019 रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मजबूत करण्यासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचबरोबर 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वरिष्ठ नेत्यांचं सामूहिक नेतृत्व असलेली समिती स्थापन करण्याची शिफारसही केली होती.

पक्षाध्यक्ष बदलण्याबाबत सोनियां गांधींना पत्र

काँग्रेसचा पक्षाध्यक्ष बदलण्याची मागणी काँग्रेसमधीलच काही वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली होती. त्यात मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांचा समावेश होता. त्यावरुन काँग्रेसचे नेते सुनिल केदार यांनी संबंधित नेत्यांनी सोनिया गांधी यांची माफी मागावी अशी मागणी केली होती.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण?

विधान परिषदेचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap), माजी आमदार चरणसिंह सप्रा (Charansingh Sapra), माजी मंत्री सुरेश शेट्टी (Suresh Shetti) यांची नावं मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

पुन्हा मराठी चेहरा मिळणार?

मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस मुंबईत पक्षाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी पुन्हा मराठी चेहरा मिळणार, की अमराठी नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार, याची उत्सुकता आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतले चेहरे

भाई जगताप – विधान परिषद आमदार. आमदारकीची दुसरी टर्म, भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत पराभव (Mumbai Congress President Eknath Gaikwad likely to get removed)

सुरेश शेट्टी – अंधेरी पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार, शेट्टी हे आघाडी सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री. विद्यार्थी चळवळीतून नेतृत्व.

चरणसिंह सप्रा – मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपाध्यक्ष, माजी विधानपरिषद आमदार, मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष (1995-2006)

संबंधित बातम्या:

काँग्रेस पुन्हा फिरुन तिथेच? राहुल गांधी अध्यक्ष की प्रियंका?

मुंबई कुणाची ? गायकवाड, जगताप की आणखी कोण ?

Milind Deora’s lobbying for Mumbai Congress presidency

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.