5

काँग्रेस पुन्हा फिरुन तिथेच? राहुल गांधी अध्यक्ष की प्रियंका?

अंतर्गत कलहाचा फटका बसल्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत.

काँग्रेस पुन्हा फिरुन तिथेच? राहुल गांधी अध्यक्ष की प्रियंका?
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 11:19 AM

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला एप्रिल महिन्यात मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. पक्षातील अंतर्गत कलहामुळे अध्यक्षपदाची निवड लांबली आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रियंका गांधी-वढेरा यांचे (Priyanka Gandhi) नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Congress President Election Rahul Gandhi or Priyanka Gandhi)

सोनिया गांधी यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती. मात्र अंतर्गत कलहाचा फटका बसल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत.

राहुल गांधी खुर्चीसाठी नाखुश

राहुल गांधी यांच्या नावालाच पक्षातून प्रथम पसंती मिळत आहे. परंतु राहुल गांधींनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नापसंती दर्शवली आहे. त्यामुळे प्रियंका गांधी-वढेरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आता प्रियंका पद स्वीकारणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्रामुळे वादंग

काँग्रेसच्या एकूण 23 नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. “काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा. सध्या पक्षाला पूर्ण वेळ देईल अशा नेतृत्त्वाची गरज आहे. त्याने लोकांना भेटावे, कोणताही विषय असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत यावी, त्याने पक्ष संघटनाला वेळ द्यावा. भाजपचा वाढता विस्तार आणि तरुणांनी मोदींना दिलेली साथ या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी होत आहे. त्यामुळे तातडीने तळापासून मोठ्या बदलांची आवश्यकता आहे.” अशी भूमिका त्या पत्रात व्यक्त करण्यात आली होती. त्या पत्रावरुन सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. (Congress President Election Rahul Gandhi or Priyanka Gandhi)

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सोनियांकडे अध्यक्षपद

सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

संबंधित बातम्या :

राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र? शरद पवारांचं नाव त्याचा भाग? वाचा सविस्तर

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गटबाजी, दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत घमासान, कोण कुणाच्या बाजूने?

(Congress President Election Rahul Gandhi or Priyanka Gandhi)

Non Stop LIVE Update
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..