राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र? शरद पवारांचं नाव त्याचा भाग? वाचा सविस्तर

दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात जे अभियान सुरु आहे त्याचाच भाग म्हणजे पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चा, असं खळबळ उडवून देणारं ट्विट निरुपम यांनी केलं आहे.

राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र? शरद पवारांचं नाव त्याचा भाग? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 12:21 PM

मुंबई :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीए अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याच्या बातम्यांनी कालचा (गुरुवार) दिवस चर्चेत राहिला. महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी जो करिश्मा शरद पवारांनी केला तोच करिश्मा देशपातळीवर पवारांनी करावा, याचाच भाग म्हणून पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद जाणार असल्याच्या बातम्या काल आल्या. मात्र या बातमीत तथ्य नसल्याचं स्पष्ट करत पवारांनी चर्चेतील हवा काढून घेतली. पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चेपाठीमागे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. (Congress leader Sanjay nirupam Says Big conspiracy against Rahul Gandhi)

“दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात जे अभियान सुरु आहे त्याचाच भाग म्हणजे पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चा”, असं खळबळ उडवून देणारं ट्विट निरुपम यांनी केलं आहे. याच अभियानाच्या अंतर्गत 23 सह्यांचं पत्र लिहिलं गेलं होतं, असंही निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“वारंवार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामधल्या उणीवा दाखवण्याचं काम एक ठराविक वर्ग करतो आहे. काँग्रेस मिटवण्याचा एक मोठा प्लॅन चालू आहे”, असं मोठं विधान आपल्या ट्विटमधून संजय निरुपम यांनी केलं आहे.

राष्ट्रीय काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल केला जावा किंवा खांदेपालट व्हावी, म्हणून काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहिलं होतं. काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाची आवश्यकता असल्याचं त्यांनी या पत्रामधून अधोरेकित केलं होतं. काँग्रेस नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात हे पत्र सोनिया गांधींना पाठवलं होतं.

एकप्रकारे काँग्रेसमधील अशी नावे ज्यांना गांधी घराण्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या तरी हातात पक्षाची सुत्रे जावी वाटतात, अशा नेत्यांनीच शरद पवार यांच्या यूपीएचे अध्यक्षपदाच्या चर्चा घडवल्या, असाच निरुपम यांच्या म्हणण्याचा मतितार्थ होतो.

पत्रावर कुणाकुणाच्या सह्या

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, शशी थरुर, विवेक टंका, मुकुल वासनिक, जितिन प्रसाद, भूपिंदर सिंह हुडा, राजिंदर कौर भट्टल, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, पी.जे. कुरियन, रेणूका चौधरी, मिलिंद देवरा, राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद सिंग, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित या नेत्यांच्या सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रावर सह्या होत्या.

UPA च्या अध्यक्षपदासाठी माझ्या नावाच्या चर्चेत तथ्य नाही- शरद पवार

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. याच विरोधी पक्षांचं नेतृत्व शरद पवार करणार असल्याच्या बातम्या दिवसभर माध्यमांधून देण्यात आल्या. मात्र UPA चं प्रमुखपद मी स्वीकारणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत, असं पवार म्हणाले.

(Congress leader Sanjay nirupam Says Big conspiracy against Rahul Gandhi)

संबंधित बातम्या

UPA अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची सगळीकडे चर्चा, पण खुद्द पवार काय म्हणतायत?

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.