XXत एवढी चरबी का आलीय? तो… राऊतांकडून मिनाक्षी शिंदेंची कथित क्लिप पोस्ट
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर तणाव आहे. या प्रकरणी माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचे नाव आल्याने खळबळ उडाली. खासदार संजय राऊत यांनी मिनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केली, ज्यात त्या धमक्या देताना दिसत आहेत.

ठाकरे गटाचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्याने ठाण्यात तणावाचे वातावरण आहे. पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचं नाव घेतलं आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा कोणत्याही राजकीय दबावाशिवाय तपास करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मिनाक्षी शिंदे आणि एका व्यक्तीची कथित ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. मिनाक्षी शिंदे या क्लिपमधून एका व्यक्तीशी बोलताना कुणाला तरी धमकावताना दिसत आहेत. मात्र, टीव्ही9 मराठी या कथित क्लिपची पुष्टी करत नाही.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ही क्लिप ट्विट करून त्यावर पोस्ट लिहिली आहे. ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा ज्यांच्यावर संशय आहे, त्या मिंधे गटाच्या मिनाक्षी शिंदे यांची भाषा पहा; ठाण्याच्या पोलिस कमिशनरला सांगून एकेकाची वाट लावेन, ही बाई अशा धमक्या देत आहे. पूर्णेकरच्या घरात गुंड घुसवून संपवेन, असे ही बाई सांगतेय! हिची अटक कधी होणार? ठाण्याचे “बीड ” झाले आहे. या लेडी डॉन ला कोण वाचवतेय? पूर्णेकरांच्या हत्येचा आणखी काय पुरावा पोलिसांना हवाय? अमित शहा यांनी कोठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र? ठाणेकरांनो जागे व्हा; बोला. व्यक्त व्हा, रस्त्यावर उतरा, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा ज्यांच्यावर संशय आहे
त्या मिंधे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांची भाषा पहा;ठाण्याचे पोलिस कमिशनरला सांगून एकेकाची वाट लावेन असे ही बाई धमक्या देत आहे,
पूर्णेकरच्या घरात गुंड घुसवून संपवेन असे ही बाई सांगतेय!
हिची… pic.twitter.com/qolJaQvJNX— Sanjay Raut (@rautsanjay61) October 1, 2026
व्हायर झालेल्या कथित क्लिमधील संवाद
मिनाक्षी शिंदे – फालतू मेसेज… बोगस अकाऊंट खोलून… यांच्या XXX दम नाही तर कशाला करायचं? आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत?
व्यक्ती – मला काही माहीतच नाही. मी पाच दिवस अॅडमिट होतो. दुसऱ्या दिवशी ऑर्डरला गेलो. मलाच बरं नाहीये. त्यामुळे मी कामावरही जात नाही. मलाच माहीत नाही.
मिनाक्षी शिंदे – तू पण येत नाही, हे लोकं पण येत नाही. यांच्या बायकाच माझ्या नवऱ्याने पळवून नेल्या का? एवढे सॅड झाले हे लोकं?
व्यक्ती- मला बरं वाटत नाही. मी ऑर्डरला आलोय. बेलापूरला काम होतं म्हणून इथं नवी मुंबईला आलो.
मिनाक्षी शिंदे – त्याच्या आईला आणि बहिणीला फोन कर. मी उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल त्याला.
व्यक्ती- काय असेल तर मी बोलतो.
मिनाक्षी शिंदे – फालतूगिरी आहे. तो XXXचा XXX भोईर तो जो करतोय, तो दुसऱ्याच्या बायकांच्या घरात जाऊन झोपतो आणि मग रस्त्यावर मारतात त्याला. त्याची लायकी काढली आहे. त्याला दुसऱ्यांचा एवढा पुळका आला आहे. दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय. त्याची पण वाट लावायला मला टाईम नाही लागणार. आता काहीच बोलणार नाही. त्याची XX एकात घुसलेली आहे ना. त्याची कशी वाजवायची ती मी वाजवणार आहे. यांच्या बायका पळून गेल्या की त्यांच्या बायकोबरोबर झोपायला गेले असं काय केलं या लोकांनी?
व्यक्ती – मी भेटतो. मी अण्णाला पण सांगितलं. आलिशापण बोलली ना…
मिनाक्षी शिंदे – पांड्याच्या XXत एवढी चरबी का आलीय? तो का XXXचा एवढा उडतोय. त्याला विचार. त्याच्या घरी येतो का भूषण झोपायला.
व्यक्ती – मी बोलता काय ते.
मिनाक्षी शिंदे – फालतू कमेंट करत आहेत. यांच्या XXत दम असेल तर या ना वन टू वन. माझ्यासमोर येऊन बोल ना. 16 तारखे नंतर मला काय दाखवायचं ते दाखवेन. त्याला सांग भीकमाग्या तू कितीही पळाला ना, तरी माझी सीट काढायची ती काढेल आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेन. नंतर घरातही तुम्ही बसणार नाही तिथे, अशी वाट लावीन तुमची. आज जी शिवाजी नगरातील घरं तुमची वाचलीत ना, मिनाक्षी शिंदेमुळे वाचली. तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार.
व्यक्ती – बोलता मी.
मिनाक्षी शिंदे – त्याच्या बहिणीलाही सांग आणि आईलाही सांग.
व्यक्ती – आरतीला सांगतो.
मिनाक्षी शिंदे – घरात कुणाला पाठवलं तर मी काय करेल समजून जा. माझ्या नवऱ्यासारखं मला समजू नका. मी वाटच लावून टाकेल. रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेन. तुम्ही आमच्या बरोबर नाही ना. तुम्ही त्यांचाच X खाणार आहे. तुम्ही तिकडेच मरणार आहे. तुम्ही शांतेत राहा. 15 दिवसानंतर तुम्हाला मानपाड्यातच राहायचं की भूषणच्या घरी राहणार आहे तुम्ही?
व्यक्ती- मीना अंटी बोलतो. मी यात नव्हतो. मी एरियात नव्हतो.
मिनाक्षी शिंदे – आम्हाला वाटलं तुला पांडेंनी सांगितलं म्हणून तू येत नाही.
व्यक्ती- नाही… नाही… असं काही नाही. आपलं काही नाही. मी लग्न झाल्यापासून…
मिनाक्षी शिंदे – ऐक ना… त्याला सांग ना. मी मानपाड्यात दिसते तशी नाही. माझी लेव्हल बघायची असेल ना, दुसऱ्याच दिवशी सीपीला फोन करून काय याची वाट लावेल ना मी ते तुला पण समजणार नाही. त्याला दामच्या लोकं मारायला आले ना? त्याला आम्ही वाचवलं आम्ही. त्याला उलटं फोन करून सांगेल घरात घुसून तोडफोड कर म्हणून. काय राहिल यांची?
व्यक्ती- बरोबर आहे. चालेल मी बोलतो.
मिनाक्षी शिंदे – ठिक आहे… ठिक आहे.
( टीप : ही क्लिप खरी की खोटी याची पुष्टी टीव्ही9 मराठी करत नाही.)