Yogesh Kadam on Manoj Jarange: ते तर सुपारी घेऊन… योगेश कदम यांचा मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले आता…
Yogesh Kadam on Manoj Jarange: 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बपासून कदम विरुद्ध जरांगे असा सामना उभा महाराष्ट्र पाहत आहे. जरांगे पाटील यांनी एसआयटी पथक आल्यानंतरही कदम यांच्या नावाचा धोशा लावला होता. आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

Yogesh Kadam on Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच्या कथित 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बने खळबळ उडवून दिली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत भाजपकडून जरांगे पाटील यांच्यासाठी 500 कोटी रुपये घेतल्याचा कथित दावा होता. त्याने एकच खळबळ उडाली. या कथित ऑडिओ क्लिपमधील नावंही पुढे समोर आली. त्यानंतर एसआयटी पथकाने परवा जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याकडून पेन ड्राईव्हसह इतर मुद्देमाल हस्तगत केला. पंचनाम्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली. तर आता याचप्रकरणात कदम विरुद्ध जरांगे असा सामना उभा महाराष्ट्र पाहत आहे. जरांगे पाटील यांनी एसआयटी पथक आल्यानंतरही कदम यांच्या नावाचा धोशा लावला होता. आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
योगेश कदम यांचा जरांगे पाटील यांच्यावर मोठा आरोप
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मनोज जरांगे सुपारी घेऊन काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मराठा समाजासाठी आमच्या सरकारने घेतलेले निर्णय इतिहासात कधीही घेतले गेले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा जरांगेंचा प्रयत्न आहे. आता त्यांची दिशा भरकटली आहे. जरांगेंचा उद्देश मराठा समाजाच्या हिताचा दिसत नाही, असेही कदम म्हणाले. जरांगेंनी दिलेल्या पेनड्राइव्ह प्रकरणी SIT चौकशी सुरू, दीड महिन्यात त्यांनी नावे जाहीर देखील केले तरी चौकशीत सत्य समोर येणारच असल्याचे योगेश कदम म्हणाले.
रामदास कदम यांचा जरांगे पाटलांवर पलटवार
कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचीही चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता रामदास कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘मनोज जरांगे घाबरले आहेत, म्हणूनच माझ्याकडे बोट दाखवत आहेत,’ अशा शब्दांत कदम यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या पत्रकार परिषद होण्याआधीच बीडमध्ये ही ऑडिओ क्लिप वाजली होती. ती माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आली, तेव्हा मी त्यावर बोललो, असंही कदम यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींचे कथित आरोप करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी आता चौकशी लावली आहे. त्यामुळे सर्व सत्य बाहेर येईल, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला. ‘माझ्याकडे खूप काही मसाला आहे, मात्र सध्या मला काही बोलायचं नाही. चौकशीत जे काही आहे ते निष्पन्न होईल,’ असं सूचक विधान करत रामदास कदम यांनी या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढवला आहे.
आता रामदास कदम यांच्या या पलटवारावर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.