Mumbai Bank: सहकारात पक्ष नसतो, संस्था मोठी करणे हा उद्देश असतो; प्रवीण दरेकरांनी सांगितले पक्षविरहित राजकारणाची गोष्ट

मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर प्रवीण दरेकर यांनी पक्षीय राजकारणावर न बोलता सहकार आणि बँकेच्या विकासासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टीकडे अधिक लक्ष देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Mumbai Bank: सहकारात पक्ष नसतो, संस्था मोठी करणे हा उद्देश असतो; प्रवीण दरेकरांनी सांगितले पक्षविरहित राजकारणाची गोष्ट
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 6:11 PM

मुंबईः मला वाटतं मुंबई बँकेत (Mumbai Bank) पक्षीय राजकारण आल्याने गेल्या वेळेला निश्चितच मुंबई बँकेत राजकारण झालं होतं. परंतु मुंबईत आम्ही काम करणारे कुठलेही पक्षातले असलो तरी सहकारातले कार्यकर्ते आहोत आणि ज्या वेळेस संस्थेचे हित येतं, संस्थेच्या प्रगतीचा विषय येतो त्यावेळेला आम्ही सारे मतभेद बाजूला टाकून एकत्रित येत असतो असं मत मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी निवड (Election as Chairman of Mumbai Bank) झाल्यानंतर आमदार प्रवीण दरेकर (BJP MLA Pravin Darekar) यांनी आपले मत मांडले. त्यामुळे आता येथून पुढे बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी, आर्थिक सक्षमतेसाठी त्या ठिकाणी एकत्रित काम करण्याचे आमचं ठरलं आहे.

त्यामुळे त्या ठिकाणी सर्वांनी एकत्रितपणे भविष्यात मुंबई बँकेला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 सहकाराचं नेतृत्त्व म्हणजे मुंबई बँक

मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड करत असताना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असं राजकारण केलं जात नाही तर मुंबईतल्या सहकार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या मुंबई बँकेत पक्ष विरहित काम करण्याचा विचार केला जातो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

बँकेच्या कार्यात राजकारण नाही

त्यामुळे बँकेच्या कार्यामध्ये राजकारण न आणता त्या ठिकाणी बँकेचा विकास आणि त्यासाठी बजावावी लागणारी भूमिका महत्वाची असते. त्यामुळे बँकेच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही आपापल्या पक्षाची पादत्राणे घालत असतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सहकारात पक्ष नसतो

सहकारात पक्ष नसतो सहकारातील संस्था मोठी करणे हा उद्देश असतो प्रसंगीत पक्षांमध्ये सुद्धा आम्ही तडजोडी करून बँकेचे हितच जपत असतो तो सहकार्याचा खरा मूलमंत्र आहे असं या निवडीवेळी त्यांनी आपले मत मांडले.

मुंबई बँक सर्वोच्च बँक

मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर प्रवीण दरेकर यांनी पक्षीय राजकारणावर न बोलता सहकार आणि बँकेच्या विकासासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टीकडे अधिक लक्ष देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई बँक ही मुंबईतील सर्वोच्च बँक असल्याने आणि सहकाराची नेतृत्व करणारी बँक म्हणून तिच्याकडे पाहिले जात असतानाच त्या बँकेचा विकास होणे गरजेचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.