Raj Thackeray : राज ठाकरे यांनी त्रिमुर्तींना दिले खास सल्ले, एकनाथ शिंदेंना तर दोनच शब्दात म्हणाले….

या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी अनेक जुने किस्से सांगितले, त्यासोबतच दिलखुलासपणे आणि रोखठोकपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत. यामध्ये राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना एका वाक्यात काही सल्ला द्यायला सांगितला.

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी त्रिमुर्तींना दिले खास सल्ले, एकनाथ शिंदेंना तर दोनच शब्दात म्हणाले....
| Updated on: Apr 27, 2023 | 3:20 AM

मुंबई : मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांची ‘लोकमत’ पुरस्कार सोहळ्यात मुलाखत झाली. ही मुलाखत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी अनेक जुने किस्से सांगितले, त्यासोबतच दिलखुलासपणे आणि रोखठोकपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत. यामध्ये राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना एका वाक्यात काही सल्ला द्यायला सांगितला.

राज ठाकरेंनी कोणता सल्ला दिला?

एकनाथराव शिंदे यांना जपून राहा, देवेंद्र फडणवीस यांना वरती संबंध नीट ठेवा, अजित पवार यांना बाहेर जेवढं लक्ष देत आहात तितकं काकांकडे पण द्या, उद्धव ठाकरे यांना काय सल्ला द्याल त्यावर, त्यांना काय सांगणार मी ते स्वयंभू आहेत. आदित्य ठाकरे यांना तेच ते, असं राज ठाकरे म्हणाले.  त्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या, तुम्ही म्हटले की देवेंद्र फडणवीसांनी वर लक्ष द्यायला हवं पण मला वाटतं त्यांनी तितकं घरीसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, त्यावर राज ठाकरे म्हणाले, मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये पडायचं नाही, असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मला दरवेळेस म्हणतात ही जी कंडिशन आपल्या घराची ती प्रत्येक राजकारण्याच्या घरी असते. प्रत्येक बिझी राजकारणाच्या, तर तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये डू यू हॅव टाइम फॉर हॉलिडेज, बॉण्डिंग? अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस 2014 पासून ते मुळात सत्तेमध्ये मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी पण खूप मोठी असते आणि उपमुख्यमंत्री कदाचित गेल्या काही सात आठ वर्षांमध्ये तुम्हाला ते वेळ देऊ शकले नसतील. परंतु त्याच्या आधी दिलेल्या तुमचे फोटो पाहिलेत. मला ते भेटले की त्यांना सल्ला देईल आणि ठिकाणंही सांगेल.