AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘म्हणे फटाके फोडायचे नाही, हा कोणता न्याय?’, राज ठाकरे यांचा सवाल

"म्हणे फटाके फोडायचे नाही. आम्ही सण कसे साजरे करायचे हे पण आता कोर्ट ठरणार, आणि कोर्टाने दिलेले दुकानांवर मराठी पाट्यांचे आदेश कुणी पाळत नाही. त्यावर कुणी लक्ष देणार नाही. हा कोणता न्याय?", असा सवाल राज ठाकरेंनी केला.

'म्हणे फटाके फोडायचे नाही, हा कोणता न्याय?', राज ठाकरे यांचा सवाल
raj thackeray Image Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 16, 2023 | 10:49 PM
Share

मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : मुंबई हायकोर्टाने फटाक्यांबाबत महत्त्वाचा निर्णय दिलाय. मुंबईत दिवाळीत फक्त रात्री 8 ते 10 वाजेच्या सुमारास फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली होती. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने हा निर्णय दिला. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टाच्या फटाक्यांच्या निर्देशांवर भूमिका मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंटवर ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुंबई हायकोर्टाने मराठी पाट्यांबाबत दिलेल्या आदेशावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

“न्यायालयं आदेश देतात पण त्यांचं खरंच काटेकोर पालन होतं का? दुकानांवर मराठी पाट्या लावायचा न्यायालयाचा आदेश का पाळला जात नाही आहे?”, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. “म्हणे फटाके फोडायचे नाही. आम्ही सण कसे साजरे करायचे हे पण आता कोर्ट ठरणार, आणि कोर्टाने दिलेले दुकानांवर मराठी पाट्यांचे आदेश कुणी पाळत नाही. त्यावर कुणी लक्ष देणार नाही. हा कोणता न्याय?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना