AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार; राज ठाकरेंचा राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार

Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार केला. त्यांच्या सूचक वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकीत मनसेच्या वाटचालीवर त्यांनी प्रकाश टाकला.

Raj Thackeray : यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार; राज ठाकरेंचा राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार
राज ठाकरे
| Updated on: Jan 30, 2025 | 2:10 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांन पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा तुफान फटकेबाजी केली. सध्याच्या राजकारणावर त्यांनी अचूक निशाणा साधला.त्यांनी राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिकांवर जोरदार प्रहार केला. मनसेच्या भूमिकेवर कायम प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांची त्यांनी चांगलीच हजेरी घेतली. त्यांच्या सूचक वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकीत मनसेच्या वाटचालीवर त्यांनी प्रकाश टाकला.

यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही…

शिवसेनेच्या बदलत्या राजकारणावर त्यांनी वरळी येथील मेळाव्यात प्रकाश टाकला. शिवसेनेचा जन्म झाला. १९६६मध्ये त्यांनी पहिली निवडणूक प्रजा समाजवादी सोबत लढवली. त्यानंतर मुस्लिम लीग सोबत युतीही केली होती. त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला. ८० मध्ये काँग्रेसही युतीही केली. नंतर भाजपसोबत गेले. त्या त्यावेळी जी परिस्थिती असते त्यानुसार पक्ष निर्णय घेतात. पण त्यांची ती बदलली ती परिस्थिती. यांचं सालं एक बरं आहे. त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार, असा जोरदार पलटवार त्यांनी टीकाकारांवर केला.

चांगले त्याला चांगले म्हटले

लोकसभेत मोदींना आपण का पाठिंबा दिला याविषयी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. लोकसभेत मोदी शिवतीर्थावर आले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर मी म्हटलं मला ज्या ज्यावेळी बोलायचं ते बोललो. मी असं काही म्हटलं का की मी बोललो नाही. मी म्हणालोच नाही. माझं बोलून झालं. माझं सुटलं ते सुटलं. जे बोललो त्याला आधार होता. जे चांगलं कराल त्याला चांगलं म्हणू. जे वाईट त्याला वाईट म्हणू, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

विरोधकांवर साधला निशाणा

यावेळी त्यांनी विरोधकांचा आणि टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. अनेकांना वाटतं राज ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना भेटलं नाही पाहिजे. भेटलं नाही पाहिजे? समोरच्याने सांगितलं चहा प्यायला ये तर काय सांगू घरीच पी. तुम्ही काय वेगळं सांगाल? मला ते भेटायला येतात तेव्हा मी तुम्हाला विकत नाही. माझा मराठीचा बाणाही बोथट करत नाही. येतात, फोन करतात, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

पराभवाने खचलो नाही, विजयाने हुरळून गेलो नाही

लहानपणापासून अनेक पराभव आणि विजय पाहिले. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही. खचलेल्या पिचलेल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाही. माझ्याबरोबर राहायचं असेल तर ठाम राहा. जे महाराष्ट्रासाठी करायचं, मराठी माणसासाठी करायचं आहे, हिंदुंसाठी करायचं ते करणारच आहोत. आज नाही, उद्या, उद्या नाही परवा. पण होणारच आहेत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा