AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतके पुरावे दिले, धनंजय मुंडे यांच्यावर मोक्का लावणार का? अंजली दमानिया यांचा अजितदादांना खडा सवाल

Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोरात असतानाच आता अंजली दमानिया यांनी अजून एक मोठी मागणी केली आहे. इतके पुरावे दिले आता, मुंडे यांच्यावर मोक्का लावणार का? असा सवाल त्यांनी केला.

इतके पुरावे दिले, धनंजय मुंडे यांच्यावर मोक्का लावणार का? अंजली दमानिया यांचा अजितदादांना खडा सवाल
अजित पवार, धनंजय मुंडे, अंजली दमानिया
| Updated on: Jan 30, 2025 | 12:22 PM
Share

मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात विरोधकच नाही तर बीड जिल्ह्यातील स्वपक्षीयच नाही तर सत्ताधारी आमदारांनी दबाव वाढवला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यातच अंजली दमानिया यांनी अजून एक मोठी मागणी केली आहे. इतके पुरावे दिले आता, मुंडे यांच्यावर मोक्का लावणार का? असा सवाल त्यांनी केला.

पुरावे तर दिले, कारवाई केव्हा?

सगळे नेते आणि अजित पवार बोलतात ना खरंच असं वाटतं की त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा. पण कसा ठेवणार ते सारखं म्हणत होते की आम्हाला पुरावे द्या, मी दिले.अजून कारवाई केली नाही. आता आज बीडमध्ये गेलेत तिथे देखील ते म्हणाले की दर्जेदार काम झाली पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांच्यावर मोक्का लावणार का?

अजित पवार म्हणाले की याच्यापुढे जर कोणी खंडणी मागितली तर मी मोक्का देखील लावेल. पण जेव्हा अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खंडणी मागितली गेली, त्यांना शासकीय बंगल्यावर बोलवण्यात आलं होतं. पहिलं कॉल रेकॉर्ड्स काढा त्यांचे टॉवर लोकेशन काढा. अवादाचे कर्मचारी तुमच्या शासकीय बंगल्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यामध्ये जर आढळले तर त्यांच्यावर तुम्ही मोक्का लावणार का? तुमच्या धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याने खंडणी मागितली आहे. तुम्ही धनंजय मुंडे यांच्यावर मोक्का का लावत नाही, असा सवाल दमानिया यांनी विचारला.

आता राजीनाम्या घ्या

ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये पहिलंत तर पुरावे दिलेत ते अतिशय स्ट्रॉंग पुरावे आहेत. तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. तो ताबडतोब घ्या. बीडमध्ये असताना तुम्ही घेतलात तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल की तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय, उगाच बोलत नाही, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

तुम्ही असं देखील म्हणालात की जर याच्यापुढे कोणी पिस्तुला दाखवली तर त्यांचा परवाना देखील रद्द करण्यात येईल. तर परवाने तर तुम्ही रद्द कराच पण आधी जी आहे ती कारवाई करा. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन खरे पालकमंत्री तुम्ही आहात हे दाखवून द्या असे दमानिया म्हणाल्या.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.