राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची वेळ ठरली

| Updated on: Apr 11, 2021 | 10:34 AM

राज ठाकरे यांना शनिवारी अचानक लीलावती रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. | Raj Thackeray

राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची वेळ ठरली
राज ठाकरे, मनसे प्रमुख
Follow us on

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांना रविवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. त्यांच्या कमरेजवळचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे राज यांच्यावर शनिवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. (MNS cheif Raj Thackeray will be discharge form Lilavati hospital today)

राज ठाकरे यांना शनिवारी अचानक लीलावती रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही राज ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, आता ते रुग्णालयातून घरी परतरणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याशी लॉकडाऊनसंदर्भात काही चर्चा करणार का, हे पाहावे लागेल.

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी 3 दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात MRI चाचणी केली होती. आज त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. फार गंभीर बाब नाही.शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाईल. परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या दुखण्याच्या त्रासाची माहिती जाणून घेत विचारपूस केली होती. तसंच लीलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचेही सुचवले होते.

संबंधित बातम्या: 

राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला अनुपस्थित

(MNS cheif Raj Thackeray will be discharge form Lilavati hospital today)