
मनसे नेते मनीष धुरी यांची नाराजी कायम आहे. टीव्ही 9 वर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. “मी नाराज शंभर टक्के आहे. आम्हाला देखील दुसरी खेळी खेळता येते. सोमवारपर्यंत जर ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युती धर्माचे पालन केले नाही, तर मोठा निर्णय घेणार. आमची नाराजगी उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यावर नाही, तर स्थानिक ठाकरे शिवसेना नेत्यांवर आहे” असं मुनीष धुरी यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी मनीष धुरी यांना त्यांची नाराजी दूर करण्याचे आश्वासन दिले. मनसे नेते मनीष धुरी गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. आणि त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मनीष धुरी अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल पण होते.
“माझी नाराजी राज साहेब ठाकरे वर किंवा पक्षावर नाही आहे. माझी नाराजगी ठाकरे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम विधानसभेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की, आम्ही जो प्रभाग मागितला होता, त्या प्रभागात आम्हाला उमेदवारी न देता, त्यांचे विभाग प्रमुख अनिल परब यांनी राज साहेबांना शब्द देऊन आम्हाला विभाग क्रमांक 66 दिलेला आहे” असं मनीष धुरी म्हणाले.
पदाधिकारी कोणीही प्रचारात सहभागी होत नाहीय
“ज्या दिवशी पासून उमेदवारी जाहीर झाली आहे, त्या दिवसापासून एक ही त्यांचा पदाधिकारी कोणीही प्रचारात सहभागी होत नाहीय आणि आतापर्यंत पण तीच परिस्थिती आहे. आमचे पदाधिकारी जिथे जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उभे आहेत. तिथे, तिथे युती धर्माचं पालन करत आहेत” असं मनीष धुरी यांनी सांगितलं.
ती भाजपची बी टीम आहे
“मातोश्री वरून आदेश आल्यानंतर युतीधर्माच पालन झालं पाहिजे होतं. शिवसेनेचे बंडखोर उभे आहेत, ती भाजपची बी टीम आहे. त्यांनी मोठी सुपारी घेतली आहे” असं मनीष धुरी म्हणाले.”काल मी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांनी माझी समजूत काढली. त्यांनी मला आश्वासित केले आहे की, एवढा पण शब्द दिला आहे की मी स्वतः येऊन कुशल धुरीच्या कार्यालयाचं उद्घाटन करतो” असं मनीष धुरी म्हणाले.
मी नाराज शंभर टक्के
“मी रविवार पर्यंत बघणार आहे. रविवार नंतर पुढची भूमिका बघू. मी पत्रामध्ये असं लिहिले आहे की ठाकरे शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी संजय कदम दीपकचा प्रचार करत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बंडखोर आहे.पण अनिल परब साहेबांनी मला पण आश्वासन दिलं होतं आणि आमच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पण आश्वासन दिलं होतं तरी पण जर पालन होत नाही तर दु:ख होणारच.मी नाराज शंभर टक्के आहे” असं मनीष धुरी म्हणाले.