AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्हाला करायचंय ते करु, पोलीस पोलिसांचं काम करतील’, मनेसेने राहुल गांधी यांच्या विरोधात शड्डू ठोकला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्रमक पवित्रा घेतलाय.

'आम्हाला करायचंय ते करु, पोलीस पोलिसांचं काम करतील', मनेसेने राहुल गांधी यांच्या विरोधात शड्डू ठोकला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 17, 2022 | 7:26 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलंय. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झालाय. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते यांच्या पाठोपाठ मनसेकडूनही राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर निषेध व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीदेखील आपण राहुल गांधींच्या मताशी सहमत नसल्याची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे राहुल गांधींच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. मनसे तर उद्या शेगावात राहुल गांधींची सभा असणाऱ्या शेगावात निषेध व्यक्त करणार आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर आक्रमक पवित्रा घेतलाय. विशेष म्हणजे ते मुंबईतील आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन शेगावच्या दिशेला निघाले आहेत. त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना उद्या शेगावात दाखल होण्याचं आवाहन केलंय.

शेगावात उद्या राहुल गांधींची सभा होणार आहे. त्यामुळे मनसेही उद्या शेगावात राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावरुन निषेध व्यक्त करणार आहे.

“राहुल गांधी जो थिल्लरपणा करत आहेत ते आम्ही खपवून घेणार नाहीत”, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय.

“आम्ही लोकशाहीला मानणारे लोकं आहोत. जे करु ते लोकशाही मार्गानेच करु. पोलीस पोलिसांचं काम करतील. कायदा कायद्याचं काम करेल. आम्हाला जे करायचंय ते आम्ही करु”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

“महापुरुषांचे अपमान आम्ही सहन करणार नाहीत. आणि जे अपमान करतील त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असादेखील इशारा त्यांनी दिला.

Follow Us
धर्मेंद्र प्रधान धर्मात्मा नाहीत! संजय राऊतांचा थेट निशाणा
Sanjay Raut | धर्मेंद्र प्रधान धर्मात्मा नाहीत! संजय राऊतांचा थेट निशाणा, सरकारला कोंडीतच पकडलं
सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंची सेना रस्त्यावर उतरणार! मु
मोठी बातमी! सोनम वांगचुकांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंची सेना रस्त्यावर उतरणार! मुंबईत आज मोर्चा
थेट लोकसभा सचिवालयातून अधिकृत पत्र अन्... ठाकरेंचे 6 फुटीर खासदार
थेट लोकसभा सचिवालयातून अधिकृत पत्र अन्... ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत मोठी अपडेट
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत मोठी उपडेट समोर
Sonam Wangchuk Health Update | सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत मोठी उपडेट समोर
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला ऑडिओ
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
खासदार फुटीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे लोक सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर….

खासदार फुटीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे लोक सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर…

देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात.

देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

निवडणुकीचा बिगुल वाजणार, ऑक्टोबरमध्ये मतदान; छत्रपती संभाजीनगरात गावगाड्यातील वर्चस्वासाठी घडामोडींना वेग.

निवडणुकीचा बिगुल वाजणार, ऑक्टोबरमध्ये मतदान; छत्रपती संभाजीनगरात गावगाड्यातील वर्चस्वासाठी घडामोडींना वेग

‘खाशाबा’ची चर्चा असताना नागराज मंजुळेंचा हा सिनेमा टॉप ट्रेंडिंगमध्ये; व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध साकारली भूमिका.

‘खाशाबा’ची चर्चा असताना नागराज मंजुळेंचा हा सिनेमा टॉप ट्रेंडिंगमध्ये; व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध साकारली भूमिका

थेट माजी महापौरांनाच 200 तोळे सोन्याला चुना, घरातील महिलांच्या एका चुकीमूळे धक्कादायक प्रकार.

थेट माजी महापौरांनाच 200 तोळे सोन्याला चुना, घरातील महिलांच्या एका चुकीमूळे धक्कादायक प्रकार

एकाचा भूतकाळच दुसऱ्याचं भविष्य.. सीरिजची कथा अशी की संपेपर्यंत जागेवरून उठणार नाही, रेटिंगही कडक!.

एकाचा भूतकाळच दुसऱ्याचं भविष्य.. सीरिजची कथा अशी की संपेपर्यंत जागेवरून उठणार नाही, रेटिंगही कडक!