AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV Thane Video: भोंग्याच्या वादावरुन पहिली ठिणगी ठाण्यात, राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसेच्या ऑफिसवर दगडफेक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यानंतर मुंब्र्यातील तन्नवर नगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी मनसेच्या वाहतूक सेना 'राजगड' या कार्यालयाचा पक्षाचा लावलेला फलक उतरवण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत कालावधी दिला होता.

CCTV Thane Video: भोंग्याच्या वादावरुन पहिली ठिणगी ठाण्यात, राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसेच्या ऑफिसवर दगडफेक
भोंग्याच्या वादावरुन पहिली ठिणगी ठाण्यातImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 7:49 PM
Share

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यानंतर मुंब्र्यातील तन्नवर नगर (Tannavar Nagar) परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) दोन दिवसांपूर्वी मनसेच्या वाहतूक सेना ‘राजगड’ या कार्यालयाचा पक्षाचा लावलेला फलक उतरवण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत कालावधी दिला होता. फलक काढला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू मग कोणतीही कारवाई झाली तरी चालेल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्याज बबलू यांनी दिला होता.

या प्रकरणी मुंब्राचे मनसे वाहतूक शाखा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी मनसे वरिष्ठ पदाधिकारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सतर्कता दाखवत मनसे वाहतूक शाखा या कार्यालयाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच राष्ट्रवादीच्या संबंधीत कार्यकर्त्यांना 148 अंतर्गत नोटीसदेखील बजावल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मनसेचा हा फलक उतरवता आला नव्हता. मात्र वातावरण शांत झाल्यानंतर पोलिसांची पाठ फिरताच काही अज्ञात इसमांनी दगड मारून हा मनसे पक्षाचा फलक फाडण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या गुंडांनी पोस्टर फाडले

या मनसेच्या फलकावर दगड मारून फडतानाचे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाल आहे. हा फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी म्हणजेच अयाज बबलू यांनी फाडला असल्याचा आरोप यावेळी मनसे वाहतूक शाखेचे मुंब्रा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी अय्याज बबलू यांनी मनसेचा हा फलक उतरवण्यासाठी धमकी देत फलक न उतरल्यास आम्ही आमच्या स्टाईलने फलक उतरवू असा इशारा दिला होता.

गुंडागर्दी खपवून घेणार नाही

या प्रकरणी प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास असून मनसे ही गुंडागर्दी खपून घेणार नाही. तसेच कोणतं इतकी हिम्मत नाही की मनसेचे ऑफिस बंद करेल. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्यानुसार राज ठाकरे यांनीदेखील भोंग्यांना विरोध केला आहे, नमाज पठण करण्यासाठी नाही. आपण स्वतः जातिवंत मुस्लिम असून आम्ही मनसे सोबत आणि राज ठाकरे यांच्या सोबत ठाम असल्याचे मत यावेळी मनसे वाहतूक शाखेचे मुंब्रा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी मांडले.

संबंधित बातम्या

Sanjay Raut: संजय राऊत को गुस्सा क्यों आता है?, टू द पॉइंट विचारा, इकडची तिकडची झाडे हलवू नका; राऊत पत्रकारांवरच भडकले

Sanjay Raut: मुंबईला केंद्रशासित करण्याचा सोमय्यांचा कट, केंद्र सरकारला प्रेझेंटेशन सादर; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्रावर वीज संकटाचे ढग? शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक;लोडशेडिंगचा फटका बसणार

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.