MNS Sandeep Deshpande : शिंदे शिवसेनेच्या साध्या शाखाप्रमुखाला बॉक्स भरुन पैसे देणारा तो वरिष्ठ नेता कोण? मनसेकडून राजकारणात खळबळ उडवून देणारा VIDEO पोस्ट
MNS Sandeep Deshpande : संतोष पवार हे पैश्यांनी भरलेल्या बॉक्ससोबत पाहायला मिळत आहेत. संदीप देशपांडे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असून व्हीडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 50 ते 60 लाखांची रोकड आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना शाखाप्रमुख संतोष पवार यांचा एक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केलाय. हा व्हिडिओ कुलाब्यातील शाखा क्रमांक 226 चे शाखाप्रमुख संतोष पवार यांचा आहे. एका गाडीमधला हा व्हिडिओ आहे.संतोष पवार मागच्या सीटवर बसलेले आहेत. पालिका निवडणुकीत एका वरिष्ठ नेत्याने हा बॉक्स दिल्याचे संतोष पवार व्हिडिओमध्ये सांगतायत.संतोष पवार हे पैश्यांनी भरलेल्या बॉक्ससोबत पाहायला मिळत आहेत. संदीप देशपांडे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असून व्हीडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 50 ते 60 लाखांची रोकड असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे पैसे कोणत्या नेत्याने संतोष पवारला दिले असा संदीप देशपांडे यांनी सवाल विचारला आहे.
“याचं उत्तर त्यांच्या शाखा प्रमुखाने दिले पाहिजे. त्यांना एवढे पैसे कुणी दिले? त्यांच्याकडे कसे आले?. संतोष पवार यांनी याचं उत्तर द्यावं. निव़डणुका घाणेरड्या पद्धतीने लढल्या गेल्या. ती व्यक्ती शाखाप्रमुख आहे, त्याला विचारा” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. “226 शाखे मधील हा व्हिडिओ आहे. तेजल पवार ह्या अपक्ष उमेद्वार होत्या. पैसे लोकांना वाटले तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. वरिष्ठांनी मला पैसे दिले, त्यांची चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. संदीप देशपांडेंनी शिंदेच्या शिवसेनेचा व्हिडिओ पोस्ट केलाय. बॉक्समधून रोकड मिळाल्याचा उल्लेख आहे. पालिका निवडणुकीसाठी वरिष्ठ नेत्याने बॉक्स दिला.
हा व्हिडिओ खरा आहे की नाही, हे तपासलं पाहिजे
“संतोष पवार यांना कोणी 50 लाख दिले? कशासाठी दिले? त्याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी कोणी दिले, त्यांच्याकडे एवढी रक्कम आली कुठून? याची चौकशी झाली पाहिजे. हा व्हिडिओ खरा आहे की नाही, हे तपासलं पाहिजे. माझ्याकडे व्हिडिओ आला मी तो टि्वट केला. हा AI जनरेटेड व्हिडिओ वाटत नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले.
ते लोकांसमोर आलं पाहिजे
हा व्हिडिओ मला कोणी पाठवला, हे सांगणं उचित नाही. ज्याने कोणी मला हा व्हिडिओ पाठवला, त्यांच्याकडे हा व्हिडिओ आला. त्यांनी तो मला पाठवला. यावरुन दिसतय की निवडणुका किती घाणेरड्या पद्धतीने लढल्या गेल्या. ते लोकांसमोर आलं पाहिजे. ती व्यक्ती अजून तिथे शाखाप्रमुख आहे. आपण तिथे जाऊन त्या व्यक्तीला विचारावं” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
(बातमी अपडेट होत आहे)