Modi Express | गणेशोत्सवासाठी मोदी एक्सप्रेस, कोकणातील चाकरमानी सुखावले

Modi Express | गणेशोत्सवासाठी पुन्हा कोकणवासीयांना मोदी एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास जलत आणि झक्कास होणार आहे.

Modi Express | गणेशोत्सवासाठी मोदी एक्सप्रेस, कोकणातील चाकरमानी सुखावले
चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेसImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 1:18 PM

Modi Express | कोकणवासीयांसाठी (Kokan) पुन्हा मोदी एक्सप्रेसची (Modi Express) भेट मिळाली आहे. आज रविवारी, 28 ऑगस्ट रोजी ही एक्सप्रेस चाकरमान्यांना घेऊन जाईल. मुंबई भाजपकडून (Mumbai BJP) कोकणवासीयांसाठी ही विशेष व्यवस्था करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गेल्या वर्षीही गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस या विशेष रेल्वेने कोकणवासीयांना गणपती उत्सवापूर्वीच सुखरुप पोहचवले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी दादर (Dadar)येथून ‘मोदी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला होता. यावेळी मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येणार आहे. या विशेष रेल्वेचा चाकरमान्यांना विशेष फायदा झाला. तळ कोकणापर्यंत चाकरमान्यांना सहज जाता यावे यासाठी एसटी महामंडळ, रेल्वे आणि खासगी वाहनांची विशेष सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ताण येणार नाही आणि गणेशभक्त सुखरुप गावी पोहचणार आहेत.

पंतप्रधानांच्या नावे विशेष गाडी

मुंबईकरांना कोकणात गणेशोत्सवासाठी सुरक्षित आणि वेळेत जाण्यासाठी ही विशेष रेल्वे सोडण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मोदी एक्सप्रेस सोडण्यास सुरुवात झाले आहे. दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. 28 ऑगस्टसाठी ही विशेष गाडी सावंतवाडीसाठी सुटेल. मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

येथे थांबले रेल्वे

मोदी एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सावंतवाडीपर्यंत जाणार आहे.ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांवर थांबेल. या गाडीचा सर्व खर्च मुंबई भाजपकडून केला जाणार आहे. या विशेष रेल्वेसाठी मुंबईतील प्रत्येक मंडलामधून 50 प्रवाशांची नावे नोंदवण्यात आली आहेत. जिल्हाध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर ही नावे नोंदवण्यात आली आहे. प्रत्येकाला 100 नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. कोकणातील चाकरमान्यांना गौर-गणपतीचा सण त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा करण्यासाठी ही विशेष गाडी सोडण्यात येत आहे.

प्रवाशांनी मानले आभार

दरम्यान मोदी एक्सप्रेस या विशेष रेल्वेसंदर्भात आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ टाकला आहे. त्यात प्रवाशांनी मोदी एक्सप्रेसच्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या एक्सप्रेसमुळे प्रवाशांच्या लुटीला चाप बसला आहे. प्रवाशांचे प्रत्येकी 1000 ते 1200 रुपये वाचल्याची प्रतिक्रिया प्रवाशाने दिली आहे.

रेल्वेकडून अतिरिक्त गाड्या

कोरोनानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतील कोकणवासीयांमध्ये गावी जाण्याची कोण लगबग उडाली आहे. होणारी तोबा गर्दी पाहता, रेल्वेकडून ३२ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचे बुकिंग यापूर्वीच झाले आहे. या गाड्या फुल झाल्या आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने 74 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली होती. यातील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान 44 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. उर्वरित रेल्वेगाड्या नागपूर, पुण्यावरून सुटणार आहेत. आता रेल्वेने 32 अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.