एमपीएससी आयोग अ‍ॅक्शन मोडवर, उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

| Updated on: Aug 13, 2021 | 7:57 PM

उद्धव ठाकरे सरकारच्या आदेशानंतर एमपीएससी आयोग अ‍ॅक्शन मोडवर पाहायला मिळत आहे. एमपीएससी आयोगाने महाराष्ट्र अभियांत्रिकी विद्युत सेवा आणि महाराष्ट्र वनसेवेच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

एमपीएससी आयोग अ‍ॅक्शन मोडवर, उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे सरकारच्या आदेशानंतर एमपीएससी आयोग अ‍ॅक्शन मोडवर पाहायला मिळत आहे. एमपीएससी आयोगाने महाराष्ट्र अभियांत्रिकी विद्युत सेवा आणि महाराष्ट्र वनसेवेच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (MPSC Commission announces candidate interview schedule)

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ च्या 7 पदांसाठी उमेदवारांची मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 24 तारखेला यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र वन सेवा गट अ, गट ब च्या 38 उमेदवारांची मुलाखत होणार आहे. ही मुलाखतदेखील 24 ऑगस्टलाच होणार आहे.

एमपीएससी आयोगाच्या धडाकेबाज निर्णयाने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेले दोन वर्ष म्हणजे 2019 पासून या उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या होत्या. अखेर आयोगाकडून या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

‘एमपीएससी’ भरतीप्रक्रियेला वेग; 4 सप्टेंबरला दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एमपीएससी’च्या माध्यमातून राज्यात साडेपंधरा हजार पदे भरण्याची घोषणा विधीमंडळात केल्यानंतर ‘एमपीएससी’च्या भरतीप्रक्रियेने वेग घेतला आहे. ‘दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020’ येत्या 4 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा जाहीर झाल्याने राज्यातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. ‘एमपीएससी’च्या सदस्यांची नियुक्ती 31 जुलैपर्यंत करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील घोषणेनुसार त्यासंबंधीचा जुलैच्या शेवटच्या आठवड्यातंच पाठवण्यात आला आहे. राज्यपाल महोदयांकडून त्यावरील कार्यवाही लवकरच होण्याची अपेक्षा असल्याचं मत सरकारमधील नेते व्यक्त करत आहेत.

‘दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020’ पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 11 एप्रिल 2021 रोजी होणार होती. कोरोनासंकटामुळे ती पुढे ढकलावी लागली होती. ती परीक्षा आता 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. ‘एमपीएससी’च्या इतरही पदांच्या भरतीलाही राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यासंबंधीचा शासननिर्णय 30 जुलै रोजीच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून भरण्यात येणार आहेत.

इतर बातम्या

मोदी सरकारच्या दबावामुळेच ट्विटरकडून काँग्रेससह पक्षाच्या नेत्यांचे अकाऊंट्स बंद; नाना पटोलेंचा आरोप

पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का?, चित्रा वाघ भडकल्या; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ इशारा

सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?

(MPSC Commission announces candidate interview schedule)