AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांच्या १५ हजार कोटींच्या एंटीलियाजवळ या उद्योगपतीने घेतला डुप्लेक्स अपार्टमेंट

Mukesh Ambani Home| मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब भारतातील सर्वात महागड्या घरात अँटिलियामध्ये राहतात. त्याची किंमत 15000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अँटिलियाजवळचा परिसर हा भारतातील सर्वात महागड्या भागांपैकी एक मानला जातो.

मुकेश अंबानी यांच्या १५ हजार कोटींच्या एंटीलियाजवळ या उद्योगपतीने घेतला डुप्लेक्स अपार्टमेंट
harsh jain and his family
| Updated on: Mar 17, 2024 | 12:29 PM
Share

मुंबई | 17 मार्च 2024 : देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान एंटीलिया प्रसिद्ध आहे. १५ हजार कोटींचा भव्य महाल असलेला हा भाग मुंबईतील सर्वात महागडा परिसर आहे. या परिसरात नुकताच आणखी एक व्यवहार झाला आहे. हा व्यवहार मुकेश अंबानी यांच्या मित्राच्या मुलाने केला आहे. मुकेश अंबानी या उद्योगपती मित्रास अनिल अंबानीप्रमाणे आपला दुसरा भाऊच मानतात. देशातील सर्वाधिक ४० श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचे नाव आहे. उद्योगपती आनंद जैन यांचा मुलगा हर्ष जैन यांनी हे अपार्टमेंट घेतले आहे. त्यांनी मुकेश अंबानीच्या घराजवळ डुप्लेक्स अपार्टमेंट घेतले आहे.

कोण आहे आनंद जैन

देशातील सर्वात श्रीमंत 40 जणांच्या यादीत आनंद जैन यांचे नाव आहे. ते आणि मुकेश अंबानी चांगले मित्र आहेत. ड्रीम11 त्यांचा मुलगा हर्ष जैन यांची कंपनी आहे. या कंपनीचे बाजारमूल्य ८ अब्ज डॉलर आहे. हर्ष यांची पत्नी रचना डेंटिस्‍ट आहे. 2013 मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यांनी एंटीलियाजवळ डुप्लेक्स अपार्टमेंट घेतले आहे. त्याची किमत 72 कोटी रुपये आहे. मुकेश अंबानी आणि आनंद जैन यांची मैत्री बालपणापासून आहे. आनंद जैन 2007 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या सर्वाधिक 40 श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर होते.

अनेक खेळाडूंसोबत करार

मुकेश अंबानी यांची मुले ईशा, आकाश आणि अनंत यांच्याप्रमाणे आनंद जैन यांचा मुलगा हर्ष जैन उद्योग विश्वात आहे. यशस्वी युवा उद्योजक म्हणून त्यांनी प्रसिद्ध मिळवली आहे. ते 65,000 कोटी रुपयांच्या ब्रँडचे सह-संस्थापक आहेत. फॅटेसी स्पोर्ट्स प्लेटफॉर्म ड्रीम 11 चे संस्थापक आहेत. त्यांनी आपली कंपनी ड्रीम 11 च्या प्रमोशनसाठी एम. एस. धोनी, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, शिखर धवन आणि अन्य खेळाडूंशी करार केला आहे.

मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब भारतातील सर्वात महागड्या घरात अँटिलियामध्ये राहतात. त्याची किंमत 15000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अँटिलियाजवळचा परिसर हा भारतातील सर्वात महागड्या भागांपैकी एक मानला जातो. हर्ष जैन आणि त्यांच्या पत्नीने तेथे 72 कोटी रुपयांचे डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.