Indian Navy : 16 नौकांची माहिती, जहाजांचे कोडवर्ड…सौंदर्यवतीच्या मोहापायी नेवी मधल्या ट्रेनीची देशासोबत गद्दारी का?

Indian Navy : नौदलातील प्रशिक्षणार्थी पाकिस्तानी ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचा संशय आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. हनी ट्रॅपद्वारे संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय. 20 हजार रुपयांच्या व्यवहाराचीही चौकशी होईल.

Indian Navy : 16 नौकांची माहिती, जहाजांचे कोडवर्ड...सौंदर्यवतीच्या मोहापायी नेवी मधल्या ट्रेनीची देशासोबत गद्दारी का?
honey trap
| Updated on: Nov 21, 2026 | 8:47 AM

नौदलातील प्रशिक्षणार्थी पाकिस्तानी ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याचा संशय आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये कार्यरत 23 वर्षीय प्रशिक्षणार्थीला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बंटी रामप्रकाश मीणा असे आरोपीचे नाव असून डॉकयार्डचे दोन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याचा संशय आहे. ‘Nattu 3’ नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून पाकिस्तानस्थित गुप्तचर ऑपरेटिव्हशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. डॉकयार्डमधील 16 नौकांची माहिती, जहाजांचे कोडवर्ड आणि एका प्रसंगी लाईव्ह लोकेशन शेअर केल्याचा आरोप आहे. आरोपीने 16 जहाजे विशाखापट्टणममध्ये
असल्याचे सांगितल्यानंतर जहाजांची माहिती शेअर केल्याचा तपास सुरु आहे.

हनी ट्रॅपद्वारे संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय. 20 हजार रुपयांच्या व्यवहाराचीही चौकशी. कोलाबा पोलिसांकडून सोशल मीडिया, चॅट्स आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी. आरोपी २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत. Official Secrets Act, IT Act आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी नौदलात कायमस्वरूपी कर्मचारी नसून प्रशिक्षणार्थी होता.

Loading...

पाकिस्तानी हँडर्लसशी कनेक्ट असल्याचा संशय

आरोपी बंटी रामप्रकाश मीणा हा राजस्थानच्या करौली जिल्ह्याचा रहिवाशी असून त्याने नेवल डॉकयार्ड आणि भारतीय नौदलाच्या संवेदनशील ठिकाणांची माहिती सोशल मीडियावर अपलोड केल्याचा संशय आहे. आरोपीची सोशल मिडिया अकाऊंट पाकिस्तानी हँडर्लसशी कनेक्ट असल्याचा संशय आहे. इन्स्टाग्रामवरुन संवेदनशील सुरक्षा ठिकाणांबद्दलची माहिती शेअर झाल्याचं मुंबई पोलिसांच्या सोशल मिडिया डिजिटल लॅबला समजलं.

तांत्रिक तपास करत पोलिसांनी आरोपीचं अकाऊंट शोधून काढलं व त्याला अटक केली. आरोपीला 23 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आरोपीच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अप अकाऊंटची तपासणी करत आहेत. त्याचा मोबाइल फोन जप्त करुन सीम कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सुद्धा चौकशी सुरु आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us