Ajit Pawar : ‘..तर कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाईल’, अजित पवारांनी व्यक्त केली भीती; काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन

| Updated on: Jun 02, 2022 | 1:35 PM

ओबीसींना त्यांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र हे आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाणार नाही, याची काळजी घेऊ. मध्य प्रदेशच्या धर्तीवर जसे तेथील ओबीसींना मदत झाली, तशी मदत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Ajit Pawar : ..तर कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाईल, अजित पवारांनी व्यक्त केली भीती; काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन
कोरोना परिस्थितीविषयी माहिती देताना अजित पवार
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या (Corona) केसेस वाढत आहेत. हे काळजी करण्यासारखे आहे. सर्वांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. कारण संख्या नंतर कशी वाढते आणि हाताबाहेर जाते, हे आपण पहिल्या, दुसऱ्या लाटेत पाहिले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. त्यामुळे आम्हीपण राज्य सरकार, वैद्यकीय शिक्षण विभाग, टास्क फोर्स यांच्यासह आरोग्य विभाग यावर काम करत आहे. सर्वांशी चर्चा करून कोरोना नियंत्रणात कसा राहील, याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे ते यावेळी म्हणाले. कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5चे नुकतेच पुण्यात 7 रुग्ण आढळून आले होते. तर राज्यातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व नागरिकांना मास्क (Mask) वापरण्यासह योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

‘ओबीसींना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न’

ओबीसींना त्यांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र हे आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाणार नाही, याची काळजी घेऊ. मध्य प्रदेशच्या धर्तीवर जसे तेथील ओबीसींना मदत झाली, तशी मदत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी दिले होते. राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर राज्य सरकारचीदेखील धांदल उडाली. कोर्टाच्या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत.

कोरोना स्थिती आणि ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले अजित पवार?

‘कमिटीचे काम सुरू’

ओबीसी आरक्षणासंदर्भात जो निर्णय झाला आणि एसटी आणि एससी चे आरक्षण ठेवण्याचा निर्णय झाला, त्यानुसार निवडणुका लागणार आहेत. मात्र राज्य सरकार ओबीसींना सर्वतोपरी मदत करण्याच्या प्रयत्नात आहे. जी काळजी घ्यायला हवी ती घेत आहोत. यासंदर्भात एक कमिटी नेमली आहे. ही कमिटी सर्व माहिती तसेच इम्पिरिकल डेटा गोळा करत आहे. एकूणच त्यावर काम सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी जीएसटी, अहमदनगर नामांतर आदी विषयांवरही भाष्य केले.

हे सुद्धा वाचा

नामांतरावर काय म्हणाले अजित पवार?

गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामांतर करून अहिल्यानगर करण्याची मागणी केली. यावर ते म्हणाले, की लोकशाहीत प्रत्येकाला अशी मागणी करण्याचा अधिकार आहे. विविध शहरांच्या नामांतराची मागणी आहे. प्रश्न कुठले महत्त्वाचे आहेत, याचा विचार केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.