Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या टॉप 10 महिला नगरसेवकांची नावं समोर; पाहा कोणाचे पारडे जड?

मुंबई महानगरपालिका महापौरपद आता खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. यामुळे दिग्गज महिला नगरसेविकांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुती कोणाला संधी देणार, याकडे आता संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.

Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या टॉप 10 महिला नगरसेवकांची नावं समोर; पाहा कोणाचे पारडे जड?
Mumbai BMC Mayor
| Updated on: Jan 23, 2026 | 9:22 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. नुकतंच मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणाच्या सोडतीनुसार, मुंबईचे महापौरपद महिलांसाठी राखीव झाले आहे. या निर्णयामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपमधील दिग्गज महिला नगरसेविकांची नावांची महापौर पदाच्या शर्यतीत पाहायला मिळत आहेत. आता याची यादीही समोर आली आहे.

भाजपचा मराठी चेहरा देण्यावर भर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप मुंबईच्या महापौरपदी एखाद्या अनुभवी मराठी महिला नगरसेविकेला संधी देण्याच्या तयारीत आहे. यामध्ये अनेकवेळा निवडून आलेल्या दिग्गज नगरसेविकांपासून ते आपल्या कार्यशैलीने प्रभाव पाडणाऱ्या तरुण चेहऱ्यांचा समावेश आहे. महायुतीच्या रणनीतीमध्ये हा चेहरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या भाजपकडे ४७ महिला नगरसेविका आहेत. त्यापैकी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महापौरपदासाठी भाजपच्या दावेदार महिला नगरसेविका

  • अलका केरकर: अनुभवी नगरसेविका, ज्यांनी महिला राखीव जागेवर विजय मिळवला
  • तेजस्वी घोसाळकर: भाजपचा तरुण आणि सक्रिय चेहरा
  • राजश्री शिरवाडकर: आपल्या उत्तम वक्तृत्व कौशल्यासाठी प्रसिद्ध
  • राणी द्विवेदी: मूळच्या नागपूरच्या असून मुंबईतील एक प्रमुख मराठी चेहरा
  • श्वेता कोरगावकर: पक्षातील अभ्यासू आणि कार्यक्षम नगरसेविका
  • योगिता पाटील: महिला राखीव जागेवरून निवडून आलेल्या प्रबळ दावेदार
  • सीमा किरण शिंदे: राखीव जागेवरील अनुभवी प्रतिनिधी
  • डॉ. शिल्पा सांगोरे: सुशिक्षित नगरसेविका म्हणून चर्चेत
  • दक्षिता कवठणकर: भाजपच्या नगरसेविकांच्या यादीतील महत्त्वाचे नाव
  • लीना देहरकर: राखीव जागेवरून निवडून आलेल्या सक्रिय नेत्या
  • निशा बंतेरा: पक्षाच्या महत्त्वाच्या महिला नगरसेविका

भाजपच्या गोटातून महापौरपदासाठी अनेक दिग्गज आणि तरुण नावांची चर्चा आहे. सध्या अलका केरकर, तेजस्वी घोसाळकर आणि राजश्री शिरवाडकर यांची नावे आघाडीवर असली तरी हायकमांड कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार?

दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेना ठाकरे गट ६५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट युती करत सत्ता स्थापन करणार आहे. महायुतीमधील इतर घटक पक्षांशी चर्चा करून आणि हायकमांडच्या मान्यतेने यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल, असे बोललं जात आहे. सध्या अनेक नावांची चर्चा असली, तरी सरप्राईज देण्याच्या भाजपच्या पद्धतीमुळे कोणाची वर्णी मुंबईच्या महापौरपदी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.