BMC Mission Zero | मुंबई महापालिकेच्या ‘मिशन झिरो’ मोहिमेला यश, उपनगरातील हॉटस्पॉटमध्ये कोरोना रुग्ण संख्या घटली

| Updated on: Aug 11, 2020 | 5:30 PM

उपनगरातील हॉटस्पॉट झालेला उत्तर मुंबईच्या भागात कोरोना रुग्ण संख्या घटली आहे.

BMC Mission Zero | मुंबई महापालिकेच्या मिशन झिरो मोहिमेला यश, उपनगरातील हॉटस्पॉटमध्ये कोरोना रुग्ण संख्या घटली
Follow us on

मुंबई : मुंबई शहरानंतर आता उपनगरात कोरोना संसर्गात घट झालेली पाहायला मिळत आहे (BMC Mission Zero). उपनगरातील हॉटस्पॉट झालेला उत्तर मुंबईच्या भागात कोरोना रुग्ण संख्या घटली आहे. पालिकेच्या मिशन झिरो मोहिमेला यश येताना दिसत आहे (BMC Mission Zero).

कोरोनाची सुरुवात ही मुंबई शहरापासून झाली होती. शहरात वरळी, धारावी, मानखुर्द, बांद्रा असे मोठे कोरोना हॉटस्पॉट तयार झाले होते. तेव्हा उपनगरात मात्र कोरोनाचा शिरकाव जास्त झाला नव्हता. पण गेल्या महिन्याभरापासून मात्र शहर नियंत्रणात असताना उपनगरात मात्र कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला होता.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

उत्तर मुंबईत झोपडपट्टीत कमी पण इमारतीमध्ये जास्त रुग्ण सापडत होते. पण पालिकेने उपनगरातील रुग्ण संख्या वाढत आहे, हे लक्षात घेत ‘मिशन झिरो’ मोहिम सुरु केली होती (BMC Mission Zero).

मुंबईत मिशन झिरो मोहिमेचा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. उत्तर मुंबईतील रुग्णसंख्या केवळ 15 दिवसात आटोक्यात आली आहे. पालिकेच्या प्रयत्नांना मोठं यश आलं आहे. दहिसर, कांदिवली, बोरिवलीमधील रुग्णसंख्या 30 टक्क्यांनी घटली आहे. हॉटस्पॉटमधील फेरीवाले, भाजीवाले यांच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

तिन्ही उपनगरातील बाधितांची संख्या 13 हजार 794 वर पोहोचली आहे. यापैकी 10 हजार 303 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता केवळ 2 हजार 842 जणांवरच उपचार सुरु आहेत. पण, या सगळ्यात 649 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

BMC Mission Zero

संबंधित बातम्या :

Pune Corona : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा ‘मिशन झिरो’ उपक्रम

अहमदनगरमध्ये एकावर एक रचलेले 12 कोरोना रुग्णांचे मृतदेह, शिवसेना नगरसेवकाकडून व्हिडीओ जारी