AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हजारो लोकांना गंडवलं, लंडनमध्ये मोठा बंगला, ईडीची नजर पडताच… मुंबईत खळबळ

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयेश तन्ना यांच्या विरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. साई ग्रुपच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे. ईडीने आतापर्यंत ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

हजारो लोकांना गंडवलं, लंडनमध्ये मोठा बंगला, ईडीची नजर पडताच... मुंबईत खळबळ
ed seizes
| Updated on: Jul 29, 2025 | 3:46 PM
Share

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयेश तन्ना यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) एक मोठी कारवाई केली आहे. जयेश तन्ना यांच्यावर सामान्य रहिवासी, खरेदीदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईदरम्यान ईडीने आतापर्यंत तब्बल ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये लंडनमधील एका आलिशान बंगल्याचाही समावेश आहे.

फसवणुकीचे स्वरूप

जयेश तन्ना यांच्या साई ग्रुपवर अंधेरीतील डी.एन. नगर, कांदिवली आणि गोरेगाव येथील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे. साई ग्रुपने गुंतवणूकदारांची तब्बल ८५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने (EOW) तन्ना आणि त्यांचे भाऊ दीप यांच्याविरुद्ध नऊ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी दोघांनाही यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

ईडीची कारवाई

ईडीने मार्च महिन्यात साई ग्रुपशी संबंधित मुंबईतील नऊ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये आक्षेपार्ह कागदपत्रे आणि बेकायदेशीर संपत्तीचे तपशील समोर आले होते. तसेच भारतातील आणि भारताबाहेरील मालमत्तांची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ईडीने जून महिन्यात सुमारे ३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या कारवाईनंतर जयेश तन्ना यांची लंडनमध्येही मालमत्ता असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. यानंतर तात्काळ कार्यवाही करत गेल्या आठवड्यात ईडीने लंडनमधील तन्ना यांचा सव्वादोन कोटी रुपये किंमतीचा आलिशान बंगला जप्त केला. हा बंगला घोटाळ्यातील रकमेतूनच खरेदी करण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत ईडीने तन्ना यांची एकूण ३५ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे.

तपास सुरु

ईडीच्या तपासात आरोपींनी बेकायदेशीररित्या मिळवलेली मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले आहे. या छाप्यांमध्ये कागदोपत्री आणि डिजीटल स्वरूपातील महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. ईडी या प्रकरणी अधिक तपास करत असून, तन्ना यांच्या परदेशातील आणखी मालमत्तांचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.